शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

पेंटीपाका, टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी; सिरोंचातील शेतकऱ्यांना दिलासा 

By संजय तिपाले | Updated: February 10, 2024 19:38 IST

सिरोंचा तालुक्यातील बहुप्रतीक्षित पेंटीपाका आणि टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे.

गडचिरोलीः सिरोंचा तालुक्यातील बहुप्रतीक्षित पेंटीपाका आणि टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. मात्र, या भागात एकही सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे शेती सिंचनाखाली येत नव्हती. धरण उशाला व कोरड घशाला अशी स्थिती होती. तालुक्यातील पेंटीपाका व रेगुंठा सारख्या भागात उपसा सिंचन योजना आणण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.

या उपसा सिंचन योजनेमुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमधील जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल तसेच विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होईल. परिणामी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका आणि टेकडा परिसरातील अनेक गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. पेंटींपाका व टेकडा उपसा सिंचन योजनेला अखेर अंतिम मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत नद्यांतील पाणी उपसून ते सिंचनासाठी वापरले जाणार आहे. योजनेमुळे सिंचनक्षेत्र वाढेल. सिरोंचातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. - धर्मरावबाबा आत्राम, मंत्री अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली