एटापल्ली : निवडणुकीच्या कामासाठी वडसावरून आलापल्ली मार्गे एटापल्लीकडे जाणाऱ्या एमएच ३१ सीबी ७५४७ या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने झाडाला धडक दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील शिवमंदिरानजीक एटापल्लीपासून तीन किमी अंतरावर ही घटना घडली. या घटनेत ट्रकमधील एक इसम गंभीर जखमी झाला आहे. सुनील तुळशिराम चंदिले (३०) रा. पोर्ला असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाला एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अधिक खालाविल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेची एटापल्ली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
भरधाव ट्रक जंगलात शिरला
By admin | Updated: October 14, 2014 23:17 IST