पाथरगोटा येथील शेतकऱी बाजीराव बगमारे हे २ जून राेजी शेतात काम करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला व यात त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याच्यात शेतातील अधिकृत विद्युत खांबावरून एका शेजारी शेतकऱ्याने आपल्या शेतात अनधिकृतपणे मोटार पंपला कनेक्शन जाेडले आहे. शेजारील शेतकऱ्याने मोटारपंप कनेक्शनकरिता डिमांड भरले होते; परंतु कनेक्शन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे सबंधित लाईनमनने खांबावर चढून तारांवर बांधणी करून ठेवली होती. शेतात काम करीत असताना शेतकऱ्याला विजेचा धक्का लागला व यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सदर कनेक्शन कमी करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण तालुक्यातील लाईट घटनेच्या रात्री बारा वाजता बंद करावे लागले होते, हे विशेष. शेतकरी मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास करून जबाबदार असलेल्या महावितरण कंपनीवर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी कली आहे.
बाॅक्स
कनेक्शन मिळण्यास दिरंगाई; वीजचाेरी वाढली
महावितरण कंपनीच्या एका लाईनमनने पाथरगाेटा येथील मृत शेतकऱ्यांच्या अधिकृत खांबावरून थेट वायरची जाेडणी दुसऱ्याच्या शेतात केली हाेती. याद्वारे दुसरा शेतकरी पीक काढत हाेता. महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना कृषिपंप जाेडणी देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी पीक वाचविण्यासाठी चाेरीची वीज वापरतात. यातूनच विजेसंदर्भात अपघात घडतात. कनेक्शन मिळण्यास दिरंगाई हाेत असल्याने अनेक शेतकरी चाेरीची वीज वापरतात.