अनंतपुरात व्याख्यान : पी. एस. भूरभूरे यांचे प्रतिपादनचामोर्शी : भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्याबरोबरच, अन्यायाविरोधात लढा उभारण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहूजन समाजात निर्माण केली आहे. अन्यायाविरद्धची लढाई आणखी तीव्र करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पी. एस. भूरभूरे यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सुरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा तथा सुधाकरराव नाईक कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अनंतपूर/रेखेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त शनिवारी व्याखानाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चव्हाण होते. कार्यक्रमादरम्यान माणिक तुरे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायत सभापती सुमेध तुरे, मारोती दुधबावरे, प्राचार्य ढोके, मांडोळे, कुसराम, चंदू बंशी, सुंदरसिंग साबळे, गजानन बारसागडे, महादेव निकोडे, धोती, गोर्लावार, गोवर्धन चव्हाण, गोपाले, मडावी, तायडे, जिजोरे, लडके, राऊत, मांडोळे, वावरे, येलेकर आदी मान्यवर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
अन्यायाविरूद्ध लढा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 03:50 IST