शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

भरधाव ट्रकने बालकास चिरडले

By admin | Updated: September 17, 2014 23:48 IST

गडचिरोली नजीकच्या कनेरी येथील वायुनंदना पॉवर प्लॅन्टसाठी कोंडा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने खेळत असलेल्या सात वर्षीय बालकास चिरडल्याची घटना धानोरा-गडचिरोली आंतरराज्यीय

मुरूमगाव : गडचिरोली नजीकच्या कनेरी येथील वायुनंदना पॉवर प्लॅन्टसाठी कोंडा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने खेळत असलेल्या सात वर्षीय बालकास चिरडल्याची घटना धानोरा-गडचिरोली आंतरराज्यीय महामार्गावर मुरूमगाव येथील महावितरण कार्यालयाच्यासमोर सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. हर्षद गंगाधर कोमा रा. मुरूमगाव असे या अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार एमएच - ४० वाय- २२१९ हा ट्रक कोंडा घेऊन संबळपूरवरून गडचिरोली-धानोरा या आंतरराज्यीय महामार्गावरून येत होता. दरम्यान या ट्रकने ७ वर्षीय बालकास जबर धडक दिली. यात हर्षद कोमा हा बालक जागीच ठार झाला. तो इयत्ता पहिलीमध्ये जि. प. प्राथमिक शाळेत शिकत होता. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. ट्रक चालकास तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी नागरिक संतप्त झाले. त्यांनी राजनांदगाव-मुरूमगाव-धानोरा-गडचिरोली या आंतरराज्यीय महामार्गावरची वाहतूक एक तास रोखून धरली. त्यानंतर मुरूमगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक एस. टी. गढवी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर हजर झाले. त्यांनी ट्रकचालक मुक्तेश्वर जीवराज मसराम याला अटक केली. अपघातग्रस्त ट्रकही ताब्यात घेतला. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गढवी करीत आहेत. यापूर्वीही या ठिकाणी दोन अपघात घडले होते. या मार्गावरील वाहतूक वाढली असल्यामुळे मुरूमगाव येथील महावितरण कार्यालयासमोर गतीरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धानोराच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेले ट्रकचे मालक पंकज साहू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (वार्ताहर)