शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१०० शेतकऱ्यांना खताचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 22:39 IST

आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या ५४ गावातील १०० अल्पभूधारक शेतकऱ्यांना युरिया व इतर खताच्या प्रत्येकी दोन बॅगचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम १४ जून रोजी शुक्रवारला आष्टी पोलीस ठाण्यात घेण्यात आला.

ठळक मुद्देअल्पभूधारकांना मदतीचा हात : आष्टी पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या ५४ गावातील १०० अल्पभूधारक शेतकऱ्यांना युरिया व इतर खताच्या प्रत्येकी दोन बॅगचे वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रम १४ जून रोजी शुक्रवारला आष्टी पोलीस ठाण्यात घेण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद पोलीस स्व.प्रकाश गोंगले यांची आई कारूबाई गोंगले होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, गणेश सिंगाडे, पोलीस मित्र आलोक मंडल आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांच्या संकल्पनेतून आष्टी पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मागील महिन्याच्या आपल्या वेतनातून पैसे जमा करून युरिया खत खरेदीसाठी दिले. एका शेतकऱ्याला दोन बॅग खत देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. कारूबाई गोंगले यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खताच्या बॅगचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन केले. शेतीपयोगी माहिती दिली. पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनीही मार्गदर्शन केले. पोलिसांतर्फे या उपक्रमातून अल्पभूधारक शेतकºयांना मदतीचा हात देण्यात आला.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस