कुरखेडा : रासायनिक खतांनी शेतजमिनी नापिकी होत चालल्या आहेत. पशुपालन व शेती एकमेकांना पूरक आहेत त्यामुळे पशुपालनाशिवाय शेतजमिनीची सुपीकता टिकवता येत नाही, असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य मनोज दुनेदार यांनी केले. पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कुरखेडाच्या वतीने अस्कड योजनेअंतर्गत तालुकास्तरीय माहिती व जनसंपर्क मेळावा रामगड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बाेलत हाेते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. प्रसाद भामरे उपस्थित हाेते. त्यानी पशुसंवर्धन विभागातील सर्व योजनांची माहिती गोपालक व शेतकऱ्यांना समजून सांगितली.
एएलडीओ ओ.डी. पटले यांनी शेळी व कुक्कुटपालनासंदर्भात मार्गदर्शन केले. आपल्याकडील शेतकरी एकाच पिकावर अवलंबून असतो, अशा वेळेस जर शेती सोबत पशुपालन हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू केला तर शेतकऱ्यांच्या आथिर्क स्त्रोतात वाढ होऊ शकते. आपल्याकडील शेतकरी एकाच पिकावर अवलंबून असतो. शेतीसोबत पशुपालन हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू केला तर शेतकऱ्यांच्या आथिर्क स्त्रोतात वाढ होऊ शकते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. टेंभरे यांनी केले, तर आभार डॉ. गावीत यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी, गोपालक व शेतकरी हजर होते.