शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

महिलांची एसपी कार्यालयावर धडक

By admin | Updated: April 12, 2015 02:12 IST

गावात अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्रीला कंटाळलेल्या चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावच्या महिला ....

गडचिरोली : गावात अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्रीला कंटाळलेल्या चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावच्या महिला गावातील १० लिटर मोहाची दारू पकडून दारूविक्रेत्यांवर कारवाई व्हावी, याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर शनिवारी धडकल्या. त्यानंतर त्यांनी गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.जिल्हास्तरावरील दारुबंदी पथकाचे अधिकारी दररोज कुठे ना कुठे दारुविक्रेत्यांवर धाड घालून कारवाई करीत आहेत, तर दुसरीकडे मात्र काही पोलीस दारुविक्रीकडे दुर्लक्ष करीत ठाण्यात बसून ढेकर देत आहेत. अशाच काही हप्तेबहाद्दर पोलिसांना कंटाळलेल्या अनखोडा येथील महिलांनी स्वत:च दारु पकडली आणि दारुच्या डबक्या घेऊनच त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचल्या. चामोर्शी तालुक्यातील अनखोडा हे गाव तसे मोठेच. जवळच आष्टी हे तालुक्याला शोभेल असे मोठे गाव आहे. तेथे पोलीस चौकीही आहे. पोलिसांचे तालुका मुख्यालय चामोर्शी येथे आहे. मात्र दोन्ही ठिकाणच्या पोलिसांच्या हाताला फारसे काम नाही. चामोर्शी तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रास दारु विकण्यात येते. अनखोडा हे गावही त्यास अपवाद नाही. गाव दारुमुक्त व्हावे, यासाठी काही महिलांनी गावात ७ वर्षांपूर्वी संघर्ष बहुउद्देशिय महिला मंडळाची स्थापना केली. दारुमुळे गावातील शांतता भंग होऊ नये म्हणून या मंडळाच्या ३५ महिला सतत प्रयत्नशील असायच्या. तरीही गावात चार-पाच जण बिनबोभाटपणे दारु विकत होते. याबाबत महिला वारंवार संबंधित बिट जमादारास सूचना देत होत्या, परंतु जमादार महाशय महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे महिलांनीच स्वत: पोलिसांची ड्युटी बजावण्याचे ठरविले.मीराबाई एकोणकार, पार्वताबाई दाणे, रेखाबाई तागडे, शांताबाई आत्राम, मायाबाई घ्यार आदी महिलांनी पदर खोचला आणि थेट दारुविक्रेत्यांवर धाड टाकली. यावेळी जवळपास १० लिटर मोहफुलाची दारु त्यांच्या हाती लागली. त्यानंतर या महिला आष्टी किंवा चामोर्शी पोलिस ठाण्यात गेल्या नाही. आज दुपारी त्यांनी दारु घेऊनच थेट गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक कार्यालयच गाठले. काही क्षण तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात मोहफुलाच्या दारुचा घमघमाट अनुभवल्यानंतर त्या महिलांची विचारपूस सुरु झाली. त्यांनीही न घाबरता एसपींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी महिलांची तक्रार शांतपणे ऐकून घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आणि तत्काळ ठाण्याबाहेर निघून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. गेल्या पंधरा दिवसांत या महिलांनी ३ वेळा दारु विक्रेत्यांवर धाडी घातल्या व दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली. (शहर प्रतिनिधी)