शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

इरपनार येथे भयमुक्त प्रजासत्ताक दिन साजरा, जनसंघर्ष समितीने फाडले नक्षल बॅनर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 15:14 IST

आदिवासी भागात सेवाकार्य करणाऱ्या जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी २६ जानेवारीला इरपनार गावात जाऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी सामूहिक वंदे मांतरम आणि राष्ट्रगीत म्हणून देशभक्तीचा संदेश देण्यात आला. 

गडचिरोली : आदिवासी भागात सेवाकार्य करणाऱ्या जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी भामरागड तालुक्यातल्या इरपनार येथे प्रजासत्ताक दिन साजरा केला. या ठिकाणी तीन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी वाहने जाळून विकासकामांना खोडा घातला होता. तर जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी नक्षलवाद्यांचे बॅनर्स फाडून भयमुक्त प्रजासत्ताक दिन साजरा केला. 

भामरागड तालुक्यातल्या धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत असलेल्या कुचेर, इरपनार या ठिकाणी पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत कुचेर आणि इरपनार दरम्यान रस्त्याचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. आदिवासी भागात रस्ते, पूल आणि इतर सुविधांची निर्मिती यास नक्षलवादी कायम विरोध करतात. त्यामुळे गेल्या २१ जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी कुचेर आणि इरपनार भागात जाऊन तेथे काम करणारे कंत्राटदार आणि माजुरांना मारहाण करून पिटाळून लावले. तसेच रस्ता निर्मितीच्या कामात असलेली वाहने पेटवून टाकली. यामध्ये ९ ट्रॅक्टर, दोन जेसीबी, ग्रेडर इत्यादी अवजड वाहनांचा समावेश होता. 

नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केल्यानंतर या भागात बॅनर लावून विकास कामांना मज्जाव केला होता. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण होते. आदिवासींच्या मनातील नक्षलवाद्यांची दहशत घालवण्याच्या उद्देशाने जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांच्या नेतृत्वात रितेश बडवाईक, संदीप आकरे, जगदीश वानोडे, रुपली नाटकर, आकाश फुलकर इत्यादी कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी रोजी इरपनार गावात जाऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला. आदिवासी बालकांच्या हाती राष्ट्रध्वज आणि फुगे दिले. यावेळी सामूहिक वंदे मांतरम आणि राष्ट्रगीत म्हणून देशभक्तीचा संदेश देण्यात आला. 

नक्षलवाद्यांनी संवैधानिक मार्गावर चालावे - शिर्केयासंदर्भात माहिती देताना जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे सर्व समस्यांवर उत्तर आहे. भारतीय संविधान हे पिडीत, शोषित आणि वंचित आदिवासींची हिंमत आहे. संविधान हे सर्वांनाच भयमुक्त जगण्याचे शिकवण देते त्यामुळे आम्ही भयमुक्तीसाठीच याठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी शिर्के यांनी नक्षलवाद्यांना संविधानावर चालण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन