शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेडिगड्डाबाधित शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:38 IST

तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर बांधलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. त्यामुळे पीकांसोबत जमिनीचेही मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना प्रकल्पबाधित म्हणून जाहीर करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी करत अनेक शेतकऱ्यांनी सोमवारी सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक देऊन आपली व्यथा मांडली.

ठळक मुद्देप्रकल्पाचे पाणी शेतात : जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर बांधलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. त्यामुळे पीकांसोबत जमिनीचेही मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना प्रकल्पबाधित म्हणून जाहीर करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी करत अनेक शेतकऱ्यांनी सोमवारी सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक देऊन आपली व्यथा मांडली.यावेळी सिरोंचाचे नायब तहसीलदार एच.एस.सय्यद यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकºयांच्या समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आले. भूमीहीन अतिक्रमणधारक शेतकºयांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, तसेच मेडिगड्डा सिंचन प्रकल्पबाधित सर्व गावांना प्रकल्पग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी आसरअल्ली परिसरातील भूमीहीन अतिक्रमणधारक व प्रकल्पबाधित शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाच्या पाण्यामुळे असरअल्ली, अंकिसा, मुकिडगुट्टा, गुमालकोंडा, मोटलाटेकडा, सुंकारअली, मुत्तापूर आदी परिसरातील शेतकºयांचे धानपीक खरडून जात आहे. सुपीक शेतजमीन पाण्याखाली राहात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मेडिगड्डा कालेश्वर प्रकल्पाचे दरवाजे उघडे असल्याने पाण्याचा प्रवाह अधिक राहत असून नदीची दरड कोसळून नदीकाठाची जमीन नदीपात्रात विलीन होत आहे. परिणामी अनेक शेतकरी भूमीहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. धरणापासून १० ते १५ किमी अंतरावरील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. जमीन खरडून जात आहे, अशा शेतकºयांना जमिनीचा मोबदला देण्यात यावा, नदीकुंटा, कोतापल्ली, चिंतारवेला, असरल्ली, लक्ष्मीदेवीपेठा, गेरापल्ली, गोराईगुडम, मोटलाटेकडा, गुमालकोंडा या गावांना धरणग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी