राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत भात, तूर, मूग, उडीद बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. यासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकासह स्वतःच्या आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल ज्या वापरकत्यार्कडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन आपली आधार नोंदणी करावी. त्यानंतर महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांनाही या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय अनुदान वितरित होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सामूहिक सेवा केंद्रात जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी आल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मंडलिक यांनी केले आहे.
महाडीबीटीमार्फत शेतकऱ्यांनी बियाणे अनुदानाचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:38 IST