शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची तहसील कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:33 IST

अखिल भारतीय किसान सभा व भारतीय शेत मजूर युनियनच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, इमारत तसेच इतर बांधकाम कामगार व मजुरांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे किसानसभा व शेतमजूर युनियनतर्फे तहसीलदारांना निवेदनशासनाच्या धोरणाविरोधात रोष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अखिल भारतीय किसान सभा व भारतीय शेत मजूर युनियनच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, इमारत तसेच इतर बांधकाम कामगार व मजुरांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य डॉ. महेश कोपुलवार, देवराव चवळे, अ‍ॅड. जगदिश मेश्राम, संजय वाकडे, प्रशांत खोब्रागडे आदींनी केले. यावेळी सिंधू कापकर, मिनाक्षी सेलुकर, चंद्रभान मेश्राम, केवळराम नागोसे, सुरेश फुकटे, मारोतराव नरुले, अमोल दामले, मारोती सेलोटे, मनोज दामले, भुपाल घुटके, रमेश मेश्राम, अमलदास प्रधान, केशव ठाकरे, प्रकाश खोब्रागडे, सुरेश सोनटक्के, राजेश वानखेडे, धनपाल लांडगे, गणेश वझाडे, पुरूषोत्तम बांडे, ललित गेडाम आदी उपस्थित होते. तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

या आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी व शेतमजूर विरोधी धोरणाचा निषेध केला. केंद्र व राज्य सरकारने कामगाराच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. रोजगार हमी योजनेसाठी शासनाकडून निधीची तरतूद केली जाते. मात्र मजुरांना कायद्यानुसार १०० दिवसांचा रोजगारही दिला जात नाही. परिणामी मजुरांचे हाल होतात. रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.निवेदनातील प्रमुख मागण्याकोरोना लॉकडाऊनच्या काळात शेती व शेतकरीविरोधात काढलेले आदेश तत्काळ मागे घेण्यात यावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा ७ हजार ५०० रुपये व १० किलो धान्य देण्यात यावे, मनरेगाच्या कायद्यानुसार प्रत्येक कुटुंबाला प्रती वर्ष किमान २०० दिवसाचे काम देण्यात यावे व प्रती दिवस ६०० रुपये मजुरी देण्यात यावे. पेरणीपासून ते मळणीपर्यंतची शेतीची सर्व कामे मनरेगा अंतर्गत करण्यात यावी. डिझेल व पेट्रोलचे वाढलेले दर कमी करावे. रोग, पूर व अकाली पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी. कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे. घरगुती विजेचे दर कमी करावे. त्यावर आकारलेला टॅक्स व वहन आकार रद्द करावा. दावे सादर करणाºया शेतकºयांना वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

टॅग्स :agitationआंदोलन