शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची कुरखेडा वीज कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:20 IST

भारनियमन रद्द करून कृषी पंपांना आवश्यक भारावा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कुरखेडा येथील कार्यलयावर धडक दिली. मागण्यांचे निवेदन सादर केले.

ठळक मुद्देशेकडोंचा मोर्चा : भारनियमन रद्द करण्याची मागणी, आदिवासी विद्यार्थी संघाचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : भारनियमन रद्द करून कृषी पंपांना आवश्यक भारावा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कुरखेडा येथील कार्यलयावर धडक दिली. मागण्यांचे निवेदन सादर केले.मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे धान पिकाला मोटार पंपाच्या सहाय्याने पाणी देणे आवश्यक झाले आहे. मात्र भारनियमण केले जात असल्याने धानपिकाला पाणी देणे अशक्य झाले आहे. पाण्याअभावी काही शेतकऱ्यांचे पीक करपायला लागले आहे. हातात आलेले पीक नष्ट होतांना बघून शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकºयांची गरज लक्षात घेऊन भारनियमण रद्द करावे या मागणीसाठी आदीवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात कुरखेडा येथील उपविभागीय अभीयंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मालेवाडा येथील वीज कार्यालयाची तोडफोड केल्याची तक्रार महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यामुळे काही युवकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. हा अन्याय असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. स्थानिक गांधी चौकातून मोर्चा काढण्यात आला. लोडशेडींग बंद करावी अशा घोषणा शेतकरी देत होते. मागण्यांचे निवेदन गडचिरोली विभागीय कार्यालयाचे अभियंता तेलतुंबडे व कुरखेडाचे उपविभागीय अभियंता मुरकुटे यांनी स्विकारले.मोर्चाचे नेतृत्व आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष जयंत हरडे, साबु सेठ, दौलत कुमोटी, आनंद बोगा, माजी पं. स. सदस्य उमाकांता मडावी, सरपंच शशीकला कुमरे, तुलसी हारामी, किरण तलांडे, उपसरपंच मनेश लेनगुरे, सुरेखा वनक्षकर, जागृती मडावी, दिलीप नैताम, सदाराम काटेंगे, जगदीश बद्रे, महादेव हिळका,े शालीक मडावी, रु षी हलामी, सदु हलामी, शेषराम मसराम, आनंद कपूर, श्रावन कसनकर, हिरामन लंजे, वासुदेव डोगंरवार, निलकंठ गावळ, सोमनाथ मसराम, लक्ष्मन डोगंरवार, मुस्तफा शेख, अशोक टेंभुर्णे, जाणू मडावी, शामराव नरोटे, अंताराम गोटा, मानीक कमरो, चमरु भैसा, हरीपाल ताफा, सूरजू पुराम, हरीश्चंद्र ढोरे, मन्साराम नैताम, नामदेव धुर्वै यांनी केले. ठाणेदार सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :electricityवीजMorchaमोर्चा