शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

सोयाबीनऐवजी कापसाकडे वळला जिल्ह्यातील शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार पेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनला मिळणार कमी भाव, लागवडीचा वाढलेला खर्च, उत्पादनात होत चाललेली घट या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबिनचे क्षेत्र कमी करण्यास सुरूवात केली. दरवर्षी सोयाबिन खालील क्षेत्र घटत चालले असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देबाजारपेठेतील अंदाजानुसार बदल : मागील वर्षी सोयाबीनची केवळ ८७ हेक्टरवर लागवड; यावर्षीही क्षेत्र घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बदलत चाललेल्या बाजारपेठेचा अभ्यास करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबिन पिकाला तिलांजली देत कापूस पिकाची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. दरवर्षी सोयाबिनचे क्षेत्र घटत चालले आहे. त्याच जमिनीत कापूस पिकाची लागवड केली जात असल्याने या पिकाचे क्षेत्र वाढत आहे.१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार पेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनला मिळणार कमी भाव, लागवडीचा वाढलेला खर्च, उत्पादनात होत चाललेली घट या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबिनचे क्षेत्र कमी करण्यास सुरूवात केली. दरवर्षी सोयाबिन खालील क्षेत्र घटत चालले असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात मागील पाच वर्षात सरासरी ३ हजार ९१० हेक्टरवर सोयाबिनची लागवड होत होती. २०१९-२० मध्ये केवळ ८७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची लागवड झाली आहे. यावर्षी तेवढीही लागवड होणार की नाही, याबाबत शंका आहे. कृषी विभागाने मात्र १ हजार ५०० हेक्अर क्षेत्रावर सोयाबिनची लागवड होईल या दृष्टीने नियोजन केले आहे. सोयाबिनची जागा आता कापूस पीक घेत आहे. पाच वर्षांपूर्वी कापसाचा पेरा अत्यंत कमी होता. मात्र शेतकरी आता सोयाबिनच्या जागेवर कापूस पिकाची लागवड करीत आहे. कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ७३५ हेक्टर आहे. २०१९-२० मध्ये सुमारे १४ हजार २१८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. २०२० च्या खरीप हंगामात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होईल. यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे.पाच तालुक्यांमध्ये विशेष भरगडचिरोली तालुक्यात ५०० हेक्टर, चामोर्शी तालुक्यात ४ हजार ७०० हेक्टर, सिरोंचा तालुक्यात ७ हजार हेक्टर, अहेरी तालुक्यात १ हजार ८०० हेक्टर व मुलचरो तालुक्यात १ हजार हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी होईल, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खते, कीटकनाशके, बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले आहे. इतरही तालुक्यांमधील शेती कापूस लागवडी योग्य आहे. त्यामुळे तेथील शेतकºयांना कापूस लागवडीसाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, कापसाला सिंचनाची आवश्यकता नाही. सिंचनाची सुविधा नसल्याच्या कारणामुळे शेतकरी जमीन पडीक ठेवतात. याच जमिनीत कापसाचे उत्पादन घेणे शक्य होते. ही बाब शेतकºयांना पटवून देण्याची गरज आहे. असे झाल्यास उर्वरितही तालुक्यांमध्ये कापसाचा पेरा वाढेल. विशेष म्हणजे, पडीक जमिनीत पीक घेतल्याने शेतकºयांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.आधारभूत कापूस खरेदी केंद्राची गरजशासनामार्फत राज्यभरात आधारभूत कापूस खरेदी केंद्र चालविले जातात. आधारभूत केंद्रावर व्यापाºयांच्या तुलनेत अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होते. गडचिरोली जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढला आहे. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. जिल्ह्यात एकही आधारभूत कापूस खरेदी केंद्र नसल्याने तेलंगणातील शेतकºयांकडून लूट होत असल्याची शेतकºयांची तक्रार आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती