शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अहेरीतून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:50 AM

येथील वृंदावन धामच्या भव्य पटांगणात भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेतर्फे अहेरी तालुक्यातील ११ गरजू शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप करण्यात आले. तसेच या ठिकाणाहून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देउपविभागातील ११ शेतकऱ्यांना बैलजोडी वाटप : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथील वृंदावन धामच्या भव्य पटांगणात भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेतर्फे अहेरी तालुक्यातील ११ गरजू शेतकऱ्यांना बैलजोडीचे वाटप करण्यात आले. तसेच या ठिकाणाहून शेतकरी जागर यात्रेस प्रारंभ करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी जागर यात्रेचे विदर्भ प्रमुख हरीष हरकडे होते. प्रमुख अतिथी म्हणूम बजरंग दलाचे क्षेत्रीय संयोजक देवेश मिश्रा, अजय निलदावार, संजय एकापुरे, किसान संघाचे प्रांत मंत्री उदय बोर्रावार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रोडमल गडलोत, विश्व हिंदू परिषदेचे अहेरी जिल्हाध्यक्ष सीताराम सोनानीया, महामंत्री अमित बेझलवार, व्यापारी संघटनेचे कन्हयालाल रोहरा, शंकरजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी संजय एकापुरे म्हणाले, शेतकरी बांधवामध्ये कृषीधर्म जागृत करण्यासाठी सदर जागरयात्रा काढण्यात आली असून ही यात्रा अहेरी येथून विदर्भातील अनेक ठिकाणी पोहोचणार आहे. शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करतात, मात्र आज शेतकºयांची दैनावस्था झाली आहे. शेतात घातक विषारी रसायनाचा वापर अधिक वाढला आहे. कीटकनाशकाच्या अधिक फवारणीमुळे पिकातील जैविक तंत्र बिघडले आहे. गोवंशाचा वापर दूध आणि मांस या साठीच झालेला आहे. शेतकरी या आत्मघातकी धोरणांना बळी पडल्याने आत्महत्या, गोहत्या, दूषित अन्नधान्य सेवनामुळे सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व भारतीय गोवंश रक्षक संवर्धन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ही शेतकरी जागरयात्रा आयोजित करण्यात आली आहे.जैविक शेती कमीत कमी लागतची असून जास्त उत्पन्न देणारी ठरत आहे. तरी याला लागणारे खत व कीटकनाशके हे गोवशांच्या शेण व गोमूत्र यापासून घरच्या घरी तयार करणे सुलभ झाले आहे. विदर्भातील शेतकरी या रसायनमुक्त शेतीचा वापर करावा. गोवशांपासून (पंचगव्या) प्राप्त विविध खत कीटकनियंत्रके, साबण, धूप, अर्क, मंजन, मच्छर अगरबत्ती आदीसह विविध पदार्थ व इतर औषधी तयार करण्यासाठी शेतकºयांनी प्रवृत्त व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सदर शेतकरी जागार यात्रेसोबत डिजिटल रथ राहणार असून देवलापार व अकोला जिल्ह्याच्या म्हैसूर येथील आदर्श गो-सेवा केंद्राने सहकार्य केले आहे.यात्रेदरम्यान अहेरी उपविभागातील अतिदुर्गम भागातील ११ गरजू शेतकऱ्यांना लकी ड्रा पद्धतीने बैलजोडीचे वाटप करण्यात आले. या यात्रेची सुरुवात पारंपरिक आदीवासी नृत्याने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार पूर्वा दोन्तुलवार यांनी केले. यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल चे अमित बेझलवार, रवी नेलकुद्री, देवेंद्र खतवार, पवन दोंतुलवार, संतोष अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.वर्धा येथे होणार समारोपविहिपतर्फे विदर्भात दोन शेतकरी जागर यात्रा निघणार असून अतिदुर्गम अहेरी आणि सिंदखेड राजा येथून यात्रेचा शुभारंभ होणार आहे. सदर यात्रा १० दिवसात २ हजार ५५१ किमी चा प्रवास करणार असून २६ जानेवारीला महात्मा गांधी व विनोबा भावे याची कर्मभूमी वर्धा येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.