शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धान बांधणीचे काम करताना वाघाचा हल्ला, शेतकरी जखमी

By संजय तिपाले | Updated: November 2, 2023 12:09 IST

मुलचेरा तालुक्यातील घटना: आरडाओरड केल्याने तावडीतून सुटका

गडचिरोली : जिल्ह्यात वन्यजीव व मानव संघर्ष काही थांबायला तयार नाही. मुलचेरा तालुक्यातील विश्वनाथनगरात शेतात धान बांधणीचे काम करण्यात व्यग्र असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविला. सोबतच्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर वाघ जंगलात पळून गेला. हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. २ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता ही घटना घडली.

रंजीत कुटीश्वर मंडल (वय ५५,रा.विश्वनाथनगर) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते गुरुवारी स्वत:च्या शेतात धान बांधणीच्या कामाला गेले होते. इतर शेतकरीही आपल्या शेतात धानबांधणीचे काम करत होते. जंगलालगत त्यांचे शेत आहे. जंगलातून अवचित आलेल्या वाघाने शेतीकामात व्यग्र असलेल्या रंजित मंडल यांच्यावर हल्ला चढविला. ते जिवाच्या आकांताने ओरडल्यावर इतर शेतकरी धावले व आरडाओरड केली, त्यानंतर वाघाच्या तावडीतून रंजित मंडल यांची सुटका झाली. वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली, त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, जखमी मंडल यांना तातडीने मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. 

महिन्यात दोन महिलांचा बळी

वाघाच्या हल्ल्यात आरमोरी तालुक्यात दोन महिलांचा बळी गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नरभक्षक वाघांना वनविभागाने जेरबंद केले, पण या घटनेने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. धान काढणीच्या हंगामातच वाघांचा उपद्रव सुरु झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरीGadchiroliगडचिरोली