शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

शेतकरी नवरा नकाे गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:33 IST

तालुका, जिल्हा स्थळासाेबतच माेठ्या शहरांमध्ये मुली देण्यासाठी वधूपिता उत्सुुक असतात. गावखेड्यामध्ये सुविधा राहत नसल्याने अशा स्थळांकडे दुर्लक्ष केले जाते. ...

तालुका, जिल्हा स्थळासाेबतच माेठ्या शहरांमध्ये मुली देण्यासाठी वधूपिता उत्सुुक असतात. गावखेड्यामध्ये सुविधा राहत नसल्याने अशा स्थळांकडे दुर्लक्ष केले जाते. व्यापारी अथवा मुलगा कुठलाही व्यवसाय करत असेल तर सामान्य घरातील मुलगी त्याला देण्यासाठी तयारी दर्शविली जाते. मात्र, करत असलेल्या व्यवसायात ताे स्थायिक झाला काय? याचाही विचार केला जाताे. त्यामुळे लग्नकार्यात वरपक्षाकडील मंडळींना विविध बाबींचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत समाजाच्या पसंती-नापसंतीची पद्धत बदलत असल्याचे दिसून येत आहे.

काेट ......

शेती व्यवसाय हा चांगला असला तरी त्यात धाेके अनेक आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायात बऱ्याचदा नुकसान हाेत असते. माझ्याकडे सात एकरापेक्षा अधिक शेती आहे. मात्र, मुलाचे लग्न जुळविण्यासाठी याेग्य मुलगी मिळत नसल्याचे समस्या आहे. - पांडुरंग लटारे, वरपिता

काेट ....

पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान हाेते. मुलगा काय करताे, याला महत्त्व नव्हते तर शेती किती आहे, कुटुंबीय कसे आहेत, त्याची प्रतिष्ठा कशी आहे. या बाबीला महत्त्व दिले जात हाेते. मात्र, आता काळानुसार स्वरूप बदलले आहे. सद्य:स्थितीत नाेकरीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकाेन बदलला आहे. मुलगा शेती करताे, असे सांगितले की, अनेक मुलींचा दृष्टीकाेन नकारात्मक दिसताे. - नीळकंठ तिवाडे, वरपिता

काेट .......

लग्नकार्यात मुलीच्या विराेधात जाता येत नाही, पूर्वी आई-वडील, कुटुंबातील लाेकांनी पसंत केलेला मुलगा, स्थळ नाकारले जात नव्हते. मात्र, आता काळानुरूप बदल झाला आहे. आता मुलीच्या मनाला प्राधान्य आहे. शेवटी तिचे आयुष्य सुखी व चांगले जावाे, अशीच आई-वडिलांची इच्छा असते. - लक्ष्मण गाेटा, वधूपिता

काेट .......

मुलगी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मुलगा नाेकरी असलेला मिळेल तर आम्ही नक्कीच लग्नासाठी तयार हाेऊ. नाेकरी किंवा व्यवसाय करणारा मुलगा असावा, अशी मुलीची इच्छा आहे. - भक्तदास चुधरी

काेट ......

दिवसेंदिवस वधू-वर परीक्षण कठीण हाेत चालले आहे. वधू-वर सूचक मंडळाकडे अनेक अर्ज येत आहेत. प्रत्येकाला सुखी व धनाढ्य कुटुंबाची अपेक्षा आहे. मुलाकडून सुंदर व देखण्या स्थळाची मागणी असते. दाेन्हीकडील परिस्थिती जुळली तरी विवाह जुळून येताे. - पंढरीनाथ कांबळे, संचालक, तेली समाज वर-वधू सूचक केंद्र, गाेगाव.

काेट ...

२० एकर शेती असलेल्या मुलाला मुलीकडील मंडळी मुलगी देण्यासाठी तयार हाेत नाही. १० हजार रुपये मासिक वेतन मिळविणाऱ्या व शहरात राहणाऱ्या मुलांना वधूकडील मंडळी प्राधान्य देत आहेत. आपण वर-वधू नाेंदणीसाठी तयार केलेल्या व्हाॅट्स ॲप ग्रुपवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच जणांचे लग्नकार्य या ग्रुपच्या माध्यमातून जुळले आहेत.

- प्रदीप महाजन, विवाह सल्लागार, पुलखल

बाॅक्स ..

सर्वाधिक मागणी डाॅक्टरांना

सर्वाधिक मागणी डाॅक्टर व अभियंत्यांना आहे. असे स्थळ असेल, तरच आमची मुलगी दाखवू असे वधूपित्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मुली शाेधताना अडचणी येत आहेत.

सद्य:स्थितीत वधूपित्याचे भाव वधारले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील, गरीब घरातील मुलगी असली तरी वधूपिता जे वाक्य बाेलेल ते वरपित्याला मान्य करावे लागेल. अन्यथा लग्न जुळणे कठीण आहे.

शेतकरी कुटुंबामध्ये मुलगी देण्यासाठी वधूपिता तयार नाही. शेतकऱ्यांकडे व त्यांच्या कुटुंबाकडे पैसा राहत नाही. शेती निसर्गावर अवलंबून आहे. यामुळे वधूपिता शेतकरी कुटुंबाला मुलगी द्यायला तयार नाही.

बाॅक्स .....

अटी मान्य असतील तर बाेला

सद्य:स्थितीत लग्न ही एक जाेखमेची बाब म्हणून शेतकरी कुटुंबाला वाटत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कुटुंबांमध्ये मुली देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात असणारा मुलगा हवा. ताे एकटाच असावा. त्याला बहीण-भाऊ नसावे, अशा अटी बरेच कुटुंबीय टाकत असतात. मुलांकडूनही सुंदर दिसणारी मुलगी प्राधान्य क्रमाने निवडली जात आहे. अपेक्षा पूर्ण हाेत असेल तरच लग्न जुळून येत आहेत.