प्रशासनाचे दुर्लक्ष : कुरंझा, बोरी चक, देशपूर, डार्ली गावांमध्ये पाणीटंचाईवडधा : आरमोरी तालुक्यातील वडधा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या डार्ली, देशपूर, कुरंजा येथील नळ योजनांचे काम मागील तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, त्याचबरोबर उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाईची समस्या कमी व्हावी, या उद्देशाने वडधा येथून तीन किमी अंतरावर असलेल्या देशपूर येथे नळ योजना मंजूर करण्यात आली. मात्र या योजनेचे अर्धे काम पूर्ण झाल्यानंतर पुढचा निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे या योजनेचे काम मागील अडीच वर्षांपासून रखडले आहे. देशपूर येथील लोकसंख्या १ हजार ५०० च्या अधिक आहे. वडधा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या कुरंझा येथील नळ योजनेच्या कामाला तीन वर्षांपूर्वीच सुरुवात करण्यात आली होती. मात्र निधीअभावी कुरंझा येथील नळ योजना अर्धवटच राहिली आहे. कुरंझा गावाची लोकसंख्या १ हजार ७०० पेक्षा अधिक आहे. वडधा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डार्ली येथीलही नळ योजना तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. डार्ली गावाची लोकसंख्या दोन हजारांपेक्षा अधिक आहे. वडधा येथून नजीक असलेल्या बोरी चक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरी चक येथील सुद्धा नळ योजना सहा वर्षांपासून निधीअभावी रखडले आहे. बोरी चक गावाची लोकसंख्या तीन हजारांपेक्षा अधिक आहे. (वार्ताहर)
निधीअभावी नळ योजना बंद
By admin | Updated: November 2, 2016 01:24 IST