शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या जलस्तरात कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:47 IST

गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच कमालीची घटली आहे. या नदीवर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना, उपसा जलसिंचन योजना आहेत.

ठळक मुद्देधरणांचा परिणाम : पाणीपुरवठा योजनांना टंचाईचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच कमालीची घटली आहे. या नदीवर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना, उपसा जलसिंचन योजना आहेत. पाणी पातळी घटल्याने पाणीपुरवठा योजनांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.गोसेखुर्द धरण वैनगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणाची निर्मिती होण्यापूर्वी वैनगंगा नदीत मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी राहत होते.वैनगंगेची धार पार करणे सहज शक्य होत नव्हते. मात्र मागील चार वर्षांपासून गोसेखुर्द धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वैनगंगेची बरीच पाणीपातळी कमी झाली आहे. तसेच चामोर्शीजवळ चिचडोह प्रकल्पही वैनगंगा नदीवरच बांधल्या गेला आहे. याही प्रकल्पासाठी पाणी अडविले जात आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे हरणघाट व त्यापुढील गावांच्या योजना अडचणीत आल्या आहेत.आॅक्टोबर महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने भूजल पातळीत घट झाली आहे. त्याचबरोबर नदी, नाले आटल्याने भूजलातील पाण्याचा उपसा वाढला आहे. कमी पावसाचाही परिणाम नदीवरही झाला आहे. त्यामुळेही वैनगंगेची पाणीपातळी घटली आहे. डिसेंबर, मार्च महिन्यातच पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :riverनदी