लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आ.डॉ.रामदास आंबटकर यांनी केले.स्थानिक केमिस्ट भवनात शनिवारी भाजपची जिल्हा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्धीकी, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगराध्यक्ष शालू दंडवते, जि.प.कृषी सभापती नाना नाकाडे, न.प.उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, बाबुराव कोहळे, रवींद्र ओल्लालवार, गडचिरोली शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, स्वप्नील वरघंटे, सदानंद कुथे, प्रशांत भृगुवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वाघरे, संचालन डॉ.भारत खटी यांनी केले. तर आभार सदानंद कुथे यांनी मानले. बैठकीला जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील भाजपच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:32 IST
विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आ.डॉ.रामदास आंबटकर यांनी केले.
शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा
ठळक मुद्देआंबटकर यांचे आवाहन : भाजपाच्या जिल्हा बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा