शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुकरमध्ये पुरुन ठेवली होती स्फोटके, नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव

By संजय तिपाले | Updated: February 19, 2024 19:49 IST

बीडीडीएस पथकाची कारवाई: कोटगुल पहाडीजवळ दोन किलो स्फोटक केली नष्ट.

गडचिरोली: पोलिसांविरुध्द घातपाती कारवायांचा नक्षल्यांचा मोठा डाव हाणून पाडण्यात पोलिस दलाच्या बीडीडीएसला (बॉम्ब शोधक व नाशक पथक)  १९ फेब्रुवारी रोजी यश आले. प्रेशर कुकरमध्ये दोन किलो घातक स्फोटके टाकून ते जमिनीत पुरुन ठेवले होते. कुरखेडा तालुक्यातील कोटगुल पहाडीजवळ हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी स्फोटके जागीच नष्ट केली.  मार्च ते मे महिन्यादरम्यान तब्बल तीन महिने नक्षलवाद्यांकडून पोलिसांना नुकसान पोहोचविण्यासाठी  'टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन' (टीसीओसी) अभियान राबविले जाते. या पार्श्वभूमीवर ही स्फोटके पोलिसांचा घातपात करण्यासाठी जमिनी दडवून ठेवल्याचा अंदाज आहे.  १९ फेब्रुवारी रोजी  कुरखेडा तालुक्यातील कोटगुलपासून ५०० मीटर अंतरावरील पहाडीच्या पायथ्याजवळ गोंडरी जंगल परिसराकडे जाणा­ऱ्या पायवाटेवर माओवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहोचविण्यासाठी    स्फोटके व इतर साहित्य पुरुन ठेवल्याची अशी गोपनिय माहिती कोटगुलचे प्रभारी अधिकारी धनंजय कुलकर्णी यांना मिळाली होती. त्यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण करुन जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. यावेळी अत्याधुनिक उपकरणाद्वारे तपासणी केली असता जमिनीत दीड ते दोन फूट खोदून प्रेशर कुकरमध्ये दोन किलो घातक स्फोटके पेरुन ठेवली होती, असे समोर आले. ही स्फोटके सुरक्षितरीत्या जागीच नष्ट करण्यात आली.

पोलीस अधीक्षक  नीलोत्पल , अपर अधीक्षक  यतीश देशमुख  ,  एम. रमेश  , उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली    उपनिरीक्षकधनंजय कुलकर्णी, बीडीडीएस पथक प्रभारी अधिकारी मयूर पवार, हवालदार पंकज हुलके,   अनंत  सोयाम, अंमलदार सचिन लांजेवार , तिम्मा गुरनुले यांनी ही कारवाई केली. कोटगुल परिसरात भूसुरुंगाबाबत वेळीच माहिती मिळाल्याने नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यात यश आले.   माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात येईल.  माओवादाची हिंसक वाट सोडून त्यांनी सन्मानाने जीवन जगणेच हिताचे आहे.- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली