शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

आदर्श आचारसंहिता लागू, फाईल्सचा घाईत निपटारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 15:10 IST

Gadchiroli : ग्रामीण भागात विकासकामांचे काढले फलक

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते त्याआधी आपापली कामे पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, विविध शासकीय कार्यालयात मोठी लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, मंगळवारी आचारसंहिता लागू होईल असे गृहीत धरून अनेकांनी कामाचे नियोजन करून ते आटोपून घेतले. मंत्री, खासदार, आमदार यांनी शासनाकडून वेगवेगळ्या योजनांमधून मंजूर करून आणलेला निधी, त्याअंतर्गत निविदा, कार्यारंभ आदेश आचारसंहितेआधी काढण्यात आले. प्रशासकीय यंत्रणेने मंजूर कामाचा श्रीगणेशा सोमवार व मंगळवारी दुपारपूर्वी आटोपून घेतला.

जिल्हा नियोजन समितीमधून एकदा का निधी जिल्हा परिषदेकडे आला की तो खर्च करण्यासाठी दोन वर्षाची मुदत असते. त्यामुळे नावीन्यपूर्ण योजना शाळेच्या बांधकामासाठीचा निधी महिला बालकल्याण आणि समाजकल्याणसाठी बंधनकारक निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया याआधीच पूर्ण झाली आहे. विभागांनी प्रशासकीय मान्यता दिल्या की ती कामे जिल्हा नियोजन समितीकडे पाठवली जातात. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून लगबग वाढली होती. निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होताच प्रशासनाकडून तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली. या काळात मतदारांवर प्रभाव पडेल, असे कोणतेही काम करण्यात येणार नाही. त्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सोमवारीच पूर्ण करून घेण्यात आली. 

मान्यतेअभावी रखडली अनेक कामे 

  • निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची चिन्हे ओळखून आधीच विकासकामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. ही कामे निवडणूक काळात करता येणार असली तरी, अन्य कोट्यवधी रुपयांच्या घरात असणारी विकासकामे थांबली आहेत.
  • यामध्ये बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, शिक्षण विभाग, आरोग्य विभागातील कामांचा समावेश असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत स्तरावरील काही कामे रखडली असल्याची माहिती आहे.

बदली अन् भरती प्रक्रियांना लागला ब्रेक कामगार, आंतरजातीय विवाह अनुदान, वृद्ध कलावंत, निराधार योजनेच्या प्रस्तावासाठी लाभार्थ्यांना निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतरच प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने अनेक विभागाच्या प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. विविध पदांच्या भरती प्रक्रियांना पूर्णता ब्रेक लागला आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांचा पूर्ण फोकस निवडणुकीवर राहणार आहे. आता प्रशासन पूर्णपणे निवडणुकीच्या मिशन मोडवर येणार आहे

टॅग्स :Code of conductआचारसंहिताMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभाGadchiroliगडचिरोली