शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

पुलाअभावी विसापूरवासीयांचा वनवास कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:22 IST

गडचिरोलीच्या कारगिल चौकातून विसापूर, विसापूर टोली व पुढे कोटगल, इंदाळा, पारडी, सोनापूर कॉम्प्लेक्स, कलेक्टर कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर गुड्डेवार यांच्या शेतालगत नाला आहे. सदर नाल्यावर पावसाळ्यात तीन ते चार फूट पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बºयाचदा ठप्प होत असते.

ठळक मुद्देदरवर्षीच्या पावसाळ्यात वाढते तीव्रता : चार किमीचा फेरा मारून नागरिकांना गाठावे लागते गडचिरोली शहर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीच्या कारगिल चौकातून विसापूर, विसापूर टोली व पुढे कोटगल, इंदाळा, पारडी, सोनापूर कॉम्प्लेक्स, कलेक्टर कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर गुड्डेवार यांच्या शेतालगत नाला आहे. सदर नाल्यावर पावसाळ्यात तीन ते चार फूट पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बऱ्याचदा ठप्प होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून येथे नवीन उंच व रूंद पूल उभारण्यात आला नाही. त्यामुळे विसापूरवासीयांचा वनवास अद्यापही कायम आहे.सोयीचा व कमी अंतराचा मार्ग म्हणून अनेक नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी विसापूर मार्गे कॉम्प्लेक्स व कोटगल, इंदाळा, पारडीकडे जातात. मात्र गुड्डेवार यांच्या शेतालगत काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून नाल्याचा आकार कमी केला. गोकुलनगरलगतच्या तलावाच्या वेस्टवेअरचे पाणी सदर नाल्याद्वारे वैनगंगा नदीत जाते. शिवाय शहरातील सांडपाणी, शेतीतील व पावसाचे पाणी याच नाल्याद्वारे वैनगंगा नदीला जाऊन मिळते. मात्र सदर नाल्यावर कमी उंचीचा व अरूंद पूल आहे. शिवाय नाल्याचा आकार कमी झाल्यामुळे संततधार पावसाने सदर नाल्याच्या पुलावर तीन ते चार फूट पाणी असते. अनेक नागरिक या पाण्यातून वाहने काढतात. या ठिकाणी अनेक दुचाकीस्वारांना अपघातही घडले आहेत.विसापूरनजीकच्या कॉम्प्लेक्स भागात लाचलुचपत प्रतिबंधक, गृहरक्षक समादेशक तसेच महावितरणचे कार्यालय आहे. महसूल विभागाच्या कर्मचाºयांचे या भागात शासकीय निवासस्थान आहे. या परिसरात जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल व पालिकेच्या शाळा आहेत. या सर्व कारणाने सोयीचा व कमी अंतराचा मार्ग म्हणून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व गडचिरोलीत येऊन काम करणारे विसापूर भागातील मजूरही याच रस्त्याने आवागमन करतात. मात्र पावसाळ्यात नाल्याच्या पुलावर पाणी चढत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद होते. दोन दिवस दमदार पाऊस झाला की तीन दिवस हा मार्ग ठप्प होतो. परिणामी चार किमीचा अधिकचा फेरा मारून कॉम्प्लेक्समार्गे नागरिकांना गडचिरोलीला पोहोचावे लागते. त्यामुळे या ठिकाणी नव्याने उंच व रूंद पुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दोन यंत्रणांच्या समन्वयाअभावी न्याय नाहीगडचिरोलीच्या कारगिल चौकाकडून विसापूर-विसापूर टोली-कोटगल-इंदाळाकडे जाणारा हा मार्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो. मात्र गडचिरोली नगर पालिकेत विसापूर भागाचा समावेश आहे. जि.प.प्रशासनाने अद्यापही सदर मार्ग गडचिरोली पालिकेकडे हस्तांतरण केला नाही. जि.प. व नगर परिषद या दोन यंत्रणेत समन्वय नसल्याने विसापूर मार्गावरील पूल व रस्त्याची समस्या ऐरणीवर आली आहे.न.प.सभापती संजय मेश्राम व नगरसेविका रंजना गेडाम यांनी या समस्येला घेऊन जुलै महिन्यात जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांची भेट घेतली. निवेदनातून नवीन पूल व रस्ता दुरूस्तीची मागणी त्यांच्याकडे केली होती.

टॅग्स :Rainपाऊस