कुरखेडा : तालुक्यात खाजगी शाळेतील मुख्याध्यापक, प्राचार्य, लिपीक व परिचर यांच्याकडे शाळांची मोठी जबाबदारी राहत असल्याने त्यांना निवडणूक कामाच्या अतिरिक्त जबाबदारीतून वगळण्यात यावे, अशी मागणी तालुका मुख्याध्यापक संघाचा वतीने तहसीलदार सोमनाथ माळी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुख्याध्यापक व लिपीक वर्गाकडे एचएससी व एसएससी बोर्ड परिक्षेचे आवेदन भरणे, स्वीकारणे, शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे स्वीकारणे तसेच इतर कामे करावी लागतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे अतिरिक्त कामे देण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. निवेदन देताना संघटनेचे तालुका अध्यक्ष डी. जे. पराते, उपाध्यक्ष डी. के. सोनवाने, सचिव एस. जी. उईके, सहसचिव आर. एम. अत्यालगडे, व्ही. एस. लोथे, यू. बी. पारधी, वासुदेव बगमारे, डी. एस. बांधे, एफ. के. बोरकर, डी. एन. मुंगमोडे, उमा चंदेल, पी. एस. सांगोळे, सी. एल. डाेंगरवार उपस्थित होते.
मुख्याध्यापक व लिपिकांना निवडणूक कामातून वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST