शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर यंत्रणेकडून वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:02 IST

वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले, रोपही आणले, मात्र वृक्ष लागवड न केल्याने रोपे सडून गेली होती. या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सामाजिक वनिकरण विभागाने हालचाली करून कर्मचारी व मजुरांमार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली.

ठळक मुद्देबातमीची दखल : वैरागड-कढोली रस्त्यालगत फेकली होती रोपे

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले, रोपही आणले, मात्र वृक्ष लागवड न केल्याने रोपे सडून गेली होती. या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सामाजिक वनिकरण विभागाने हालचाली करून कर्मचारी व मजुरांमार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली.३३ कोटी वृक्ष लागवड मोहीमेंतर्गत सामाजिक वनिकरण विभागाने वैरागड-कढोली मार्गावर पाटणवाडा-कराडी गावादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यासाठी रोपटे आणले. मात्र वृक्ष लागवड न केल्याने हे रोप सडून गेले होते. याबाबत लोकमतने १७ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले. सदर वृत्ताची दखल घेऊन चौकशी करण्यात आली. यात सत्यता आढळल्याने रोपे लावण्यात आली.सामाजिक वनिकरण विभागाकडे वन परिक्षेत्राचा भार जास्त येत असल्याने वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात वृक्ष लागवड व्हावी, रोपांची हानी होऊ नये, यासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करून मजुरांकरवी वृक्ष लागवड केली जाते. मात्र रोजंदारी तत्वावर नेमलेल्या चौकीदाराने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने पाटणवाडा-कराडी गावादरम्यान वृक्ष लागवडीसाठी खोदलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण झाले नाही. परिणामी लागवडीसाठी आणलेली रोपे करपून गेली. दरम्यान लोकमतने १७ जुलैच्या अंकात ‘रस्त्याच्या कडेला रोप फेकले’ अशा मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून सामाजिक वनिकरण विभागाचा भोंगळ कारभार उजेडात आणला. त्यानंतर सामाजिक वनिकरण विभाग गडचिरोलीच्या उपवनसंरक्षकांनी १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मोका चौकशी केली. या चौकशीत लोकमतच्या वृत्ताची सत्यता सिध्द झाली. लगेच विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन खोदलेल्या खड्ड्यात नवीन रोप आणून वृक्षारोपण करण्यात आली. लावलेली सर्व रोपे जीवंत आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग