शहरातील दुर्गा साई भजन मंडळासह अनेक मंडळाच्यावतीने गावात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत भजन गात सामाजिक समस्याची भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न चालविला आहे . भजनी मंडळात महिलांचासुद्धा सहभाग आहे. भजन मंडळ साधारणपणे जन्माष्टमी, कार्तिक, हनुमान जयंती, आषाढी एकादशी, काकड आरती तसेच गावातील गणपती, शारदा, दुर्गा आदी कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नामदेव, तुकाराम, एकनाथ, मुक्ताबाई या संतपरंपरेतील पौराणिक, आध्यात्मिक, यासह गण, गौळण आदीसह आरती भजन गाणाऱ्या मंडळींना मुखोद्गत असून तालासुरात गायलेल्या या भजनाच्या दिशेने नागरिक येऊन भजनाचा आस्वाद घेत असतात. साधारण महिनाभर आवडीने घराघरात भजन ठेवले जात असते मात्र भजनकरी कोणताही आळस न करता संगीतातून लोकांचे मनोरंजन तसेच प्रबोधन करीत हा वारसा जोपासत आहेत.
180921\img_20210918_151239.jpg
रिमिक्स युगात भजनाची गोळी कायम फोटो