शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपूनही एसटीच्या 25% बसेस आगारातच उभ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 21:35 IST

अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना कोणते बिघाडाचे काम निघतेच आणि बस दुरुस्त होईपर्यंत चालक आणि वाहकांना वाट पाहावी लागत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पावसाळा संपला असला तरी जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था,एसटीचे सुटे भाग उपलब्ध नसणे, डिझेलची कमरता यामुळे गडचिराेली व अहेरी आगारातील २५ टक्के बसेस आगारातच पडून राहतात. यावरून एसटीची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय हाेत असल्याचे दिसून येत आहे. अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना कोणते बिघाडाचे काम निघतेच आणि बस दुरुस्त होईपर्यंत चालक आणि वाहकांना वाट पाहावी लागत आहे. प्रवासी देखील तासनतास बसस्टँडवर बसची वाट पाहत  असतात. खासगी वाहनांचे तिकीट दर वाढले असले तरी प्रवाशांना नाईलाजाने त्यांच्याकडेच जावे लागत आहे. 

यांत्रिकांचीही वानवाअहेरी आगारात एकूण ८६ बसेस वाहने आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी व देखभालीसाठी ७४ यांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु आजच्या स्थितीत अहेरी आगारात केवळ २६ यांत्रिक कर्मचारीच आहेत. ६० यांत्रिकी कर्मचाऱ्यांची पदे रिकामी आहेत. 

पावसाळ्यानंतरही रस्त्यांची दैनावस्था कायम -    पावसाळ्यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य नाही. असे बांधकाम विभागाकडून सांगितले जात हाेते. आता मात्र पावसाळा संपला आहे. तरीही रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. -    अहेरीवरून सिराेंचासाठी दिवसातून एकाच बसच्या दाेन फेऱ्या हाेत हाेत्या,आता केवळ एकच फेरी हाेते. दाेन फेऱ्यांसाठी जेवढा वेळ लागते तेवढाच वेळ आता एकाच फेरीसाठी लागत असल्याने अधिक प्रमाणात डिझेल लागते. त्यामुळे एसटीचा ताेटा वाढत चालला आहे. 

डिझेलचा खर्चही भरून निघणे कठीणरत्यांच्या दुरवस्थेमुळे एसटीची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. इच्छित स्थळी पाेहाेचण्यासाठी आता दुप्पट कालावधी लागत आहे. तेवढा वेळ बस सुरूच राहत असल्याने दुप्पट डिझेल लागत आहे. प्रवासी मात्र तेवढेच मिळत असल्याने उत्पन्नात वाढ झाली नाही. परिणामी आगाराचा ताेटा वाढत चालला आहे.

बस वेळेवर कशी पाेहाेचणार?अहेरी आगारात मानव विकास मिशनच्या एकून ४२ बसेस आहेत. यातील बहुतांश बसेस दरराेज विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी साेडल्या जातात. मात्र रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याने बस पाेहाेचण्यास उशीर हाेतो. बस आगारात आल्यानंतर तिची हमखास दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे पुन्हा उशीर हाेते. त्यातच काही वेळेला साहित्य राहत नाही. परिणामी बस आगारातच उभी ठेवावी लागते. 

 

टॅग्स :state transportएसटी