कोविड संसर्गाबाबत नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी व सल्ला घेण्यासाठी पंचायत समिती येथे कोविड नियंत्रण कक्ष स्थापन केले असून टोल फ्री क्रमांक -०७१३५२९५२४० या नंबरवर संपर्क करता येणार आहे. विलगीकरण कक्ष (ट्रिपल सी )मध्ये बेड व्यवस्था आहे किंवा नाही, लसीकरण केंद्राची माहिती, तपासणी केंद्राची माहिती, एखादा नागरिक गृहविलगीकरणात असून तो नागरिक बाहेर फिरत असल्यास त्यांची माहिती कळवणे ,गावात, शहरात, लग्नकार्य, गृहवास्तू इतर समारंभ व गर्दीचे कार्यक्रम होत असल्यास यांची माहिती येथे कळविता येणार आहे. विलगीकरणामध्ये क्वारंटाइन म्हणून भरती असलेले रुग्ण यांना जेवण, डॉक्टर ,विद्युत पंखे, स्वच्छता, आदी सेवा मिळत नसेल तर याबाबत अडचणी व तक्रार असल्यास रुग्णाला तक्रार करता येणार आहे.
तरी नागरिकांनी या कोरोना संसर्ग नियंत्रण कक्षाला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन कोरोना महामारी संकटात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार जितेंद्र सिकतोडे, प्रभारी संवर्ग विकास अधिकारी डॉ. सागर डुकरे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण लायबर यांनी केले आहे.