लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे जिल्ह्यातील नोकर भरतीकरिता स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यातील अनेक युवक-युवती उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना स्थान द्यावे, जिल्ह्यातील पोलीस भरती, वन विभाग, महसूल विभाग, जिल्हापरिषद, आरोग्य विभागातील विविध भरत्यांमध्ये निवड मंडळांच्या माध्यमातून स्थानिकांना संधी द्यावी. स्थानिक बेरोजगारांना संधी दिल्यास येथील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्हा विस्ताराने खुप मोठा असून अहेरी उपविभागातील बहुतांश गावे अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात आहेत. येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात विविध कामानिमित्त येताना जवळपास अडीचशे किमीचे अंतर कापावे लागते. आर्थिकदृष्ट्या ये-जा करणे त्यांना परवडत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी आलापल्लीचे सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी केली.
नोकर भरतीसाठी स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:04 IST
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात.
नोकर भरतीसाठी स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करा
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्याची मागणी