शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

अभियंत्याची मालमत्ता कोटींवर

By admin | Updated: June 11, 2015 01:43 IST

आरमोरी पंचायत समितीत शाखा अभियंता (वर्ग-३) या पदावर कार्यरत असलेले मनोज झेंबाजी मोटघरे याला ५० हजार रूपयांची लाच घेताना गडचिरोली येथील....

धाडसत्र : नागपूर, आरमोरीतील घराची झडतीगडचिरोली : आरमोरी पंचायत समितीत शाखा अभियंता (वर्ग-३) या पदावर कार्यरत असलेले मनोज झेंबाजी मोटघरे याला ५० हजार रूपयांची लाच घेताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली होती. त्यानंतर लगेच त्याच्या नागपूर व आरमोरी येथील घराची झडती घेण्यात आली. या झडतीत त्याच्याकडे १ कोटी १ लाख १५ हजार ३७० रूपयांची मालमत्ता असल्याचे एसीबीला आढळून आले आहे.आरमोरी तालुक्यातील वडधा ग्राम पंचायतमध्ये मनेरगांतर्गत १ लाख ८७ हजार ८८४ रूपयांच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासोबतच एमबी रजिस्टर तयार करण्याकरिता शाखा अभियंता मनोज मोटघरे याने ५० हजार रूपयांची लाच घेतली होती. त्याच्या विरूद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्या नागपूर व आरमोरी येथील घराची झडती घेतली. नागपूर येथील घर झडतीदरम्यान त्याच्या घरी तीन लाख २५ हजार रूपये रोख, १२० ग्रॅम सोने, मिहान भागात आठ लाख रूपये किमतीचा प्लॉट, बँकेतील शिल्लक ९५ हजार ४३८ व घरगुती साहित्य असे मिळून २४ लाख १८ हजार ४४० रूपयांची मालमत्ता मिळून आली. आरमोरी येथील घर झडतीमध्ये १७ लाख २२ हजार ८३० रूपये रोख, नागपूर येथील प्लॅटची किंमत पाच लाख ५० हजार ९१८, आरमोरी व इतर ठिकाणी असलेले सात प्लॉट किंमत नऊ लाख १९ हजार, पत्नी व त्यांच्या नावे असलेल्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम २२ लाख सहा हजार १८६, आरमोरी येथील घराची किंमत आठ लाख एक हजार, धानोरा येथील घराची किंमत ३५ हजार, फिगो कंपनीचे चारचाकी वाहन सात लाख दोन हजार, मोटारसायकल किंमत ६० हजार, दोन मुदतठेवी सात लाख, असे एकूण ७६ लाख ९६ हजार ९३० रूपयांची मालमत्ता आणि १० ग्रॅम सोने मिळून आले आहे. दोन्ही ठिकाणी घेण्यात आलेल्या घर झडतीमध्ये २४ लाख १८ हजार ४४० रूपये व ७६ लाख ९६ हजार ९३० रूपये असे एकूण एक कोटी एक लाख १५ हजार ३७० रूपयांचे रोख व मालमत्ता एसीबीला आढळून आली.सदर कारवाई पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रोशन यादव, पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)१२ पर्यंत पोलीस कोठडीलाचखोर शाखा अभियंता मनोज मोटघरे याला बुधवारी गडचिरोली येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.