शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वन हक्काच्या नावाखाली जंगलावर वाढतेय अतिक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 17:57 IST

जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्र घटले: पर्यावरणाला पोहोचतोय धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जंगलाचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, वन हक्काच्या नावाखाली अनेक धनिक लोकांनी जमिनी बळकावल्या. ज्या ठिकाणी जंगल होते, ते नष्ट करून शेतजमिनी काढल्या. मोठ्या प्रमाणात जंगलाचा भूभाग नष्ट केला. पर्यावरण व पर्यावरणाचे घटक नष्ट झाले. लहान तलाव, बोड्या होत्या. त्या नष्ट करून शेतजमिनी तयार करण्यात आल्या. त्यातील पर्यावरणाचे घटक नष्ट झाले. गेल्या काही वर्षांपासून वन हक्काच्या नावाखाली जंगलावर वाढत असलेले अतिक्रमण पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. 

ज्याच्याजवळ जमिनीचा तुकडा नाही, अशा गरीब व्यक्तीला हक्काची जमीन मिळावी यासाठी सन २००६ मध्ये वन हक्क कायदा आला. एकेकाळी गडचिरोली जिल्ह्यात ७२ टक्के वनव्याप्त भाग होता, तो कधी ५२ टक्क्यांवर आला, हे कळले नाही. गडचिरोलीकर आजही ७२ टक्के जंगलाचा दिंडोरा पिटत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ७२ टक्के जंगल असलेला वनव्याप्त भाग कमी होण्याला शासनाची अनेक धोरणे कारणीभूत आहेत. जिल्ह्यातील जास्त घनतेच्या फार मोठ्या जंगलाची एफडीसीएमने कत्तल केली. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी घनदाट जंगल होते, ते जंगल वनविभागाने वनविकास महामंडळाकडे वर्ग केले आणि ते संपूर्ण घनदाट जंगल एफडीसीएमने सपाट केले. उरलेले जंगल जिल्ह्यातील सहकारी संस्थांना कुपकामापोटी लिलावात देण्यात आल्या. संस्थांकडून वनाची हानी झाली. ती इतकी भयंकर आहे की, येत्या ५० वर्षांत भरून निघणे कठीण झाले आहे.

झुडपी जंगलही होताहे नष्टआरमोरी वन परिक्षेत्रासह अनेक ठिकाणचे झुडपी जंगल नष्ट होताना दिसून येत आहे. नागरिकांचे वाढते अतिक्रमण, वाढते शहरीकरण तसेच विविध सरकारी कामांसाठी जागा दिल्या जात असल्याने गाव व शहरालगतच्या झुडपी जंगलाचे क्षेत्र कमी होत आहे. पूर्वीसारखे झुडपी जंगल आता गावाजवळ दिसून येत नाही. मोठे जंगल व झुडपी जंगलाचे संरक्षण करणे आता आवश्यक झाले आहे.

वृक्षतोडीवर सक्त कारवाई नाहीआजही ग्रामीण भागात वीटभट्ट्या लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. पण, वनविभागाकडून अशा अवैध वृक्षतोडीवर सक्त कारवाई होताना दिसत नाही. कुंपणासाठी, जळावू लाकूड, सरपण यासाठी झाडे तोडली जातात. एकेकाळी गावालगत असणारे जंगल आता गावापासून कोसो दूर गेले आहेत. वृक्षतोड करणाऱ्यांच्या विरोधात वनविभाग कठोर कारवाई करीत नसल्याने जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्र घटले आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी वन विभागाने तसेच शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :forestजंगलEnchroachmentअतिक्रमणGadchiroliगडचिरोली