शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

वडधातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण

By admin | Updated: May 30, 2015 02:02 IST

तालुक्यातील वडधा येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मार्ग अरूंद झाला असून अपघाताची शक्यता बळावली आहे.

आरमोरी : तालुक्यातील वडधा येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मार्ग अरूंद झाला असून अपघाताची शक्यता बळावली आहे.वडधा येथील मुख्य चौक असलेल्या पोर्ला ते रांगी व देशपूर ते डार्ली या मार्गांवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. काही दुकानदारांनी दुकानासमोर शेड उभारले असून हे शेड नालीच्या पलीकडे रस्त्यावर आले आहेत. टॅक्सी वाहतूकदारही त्यांचे वाहन रस्त्यावरच ठेवतात. त्यामुळे प्रवाशांना या रस्त्यावरून मार्गच राहत नाही. या चौकामध्ये आजपर्यंत किरकोळ अपघातही झाले आहे. मुख्य मार्गावर प्रवासी निवारा उभारला आहे. मात्र या प्रवासी निवाऱ्याच्या सभोवताल अतिक्रमण झाल्याने हा प्रवाशी निवारा दिसून येत नाही. त्यामुळे प्रवाशी या निवाऱ्यात न थांबता बाहेरच थांबून बसची वाट पाहणे पसंत करीत असल्याचे चित्र दिसून येते.वडधा ते डार्ली मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर दररविवारी आठवडी बाजार भरते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. वाहनधारकांना या मार्गावरून वाहन नेताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. बाजारामुळे गावातील शेतकऱ्यांची जनावरे गावामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणावरून बाजार उठवून ग्राम पंचायतीने यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य विवेक खेवले, दुर्वेश खेवले, रेवनाथ गंडाटे, रमेश चापले, प्रकाश देशमुख, मधुकर भजबुजे यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे.