गडचिराेली : तालुक्यातील चांभार्डा येथे आठवडाभरापासून राेजगार हमीची कामे सुरू आहेत. सध्या चार शेतकऱ्यांच्या शेतात मजगीची कामे सुरू असल्याने या माध्यमातून ४०० मजुरांना राेजगार मिळाला आहे. महिनाभर गावातील मजुरांना पुरतील एवढी कामे हाेणार आहेत.
महात्मा गांधी राेजगार हमी याेजनेंतर्गत चांभार्डा येथे राेजगार हमी याेजनेच्या कामाचा शुभारंभ सरपंच सूरज उईके यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच संदीप आलबनकर, पाेलीस पाटील अश्विनी मेश्राम, राेजगार सेवक विलास ठाकरे, दत्तू झरकर, शेतकरी पुरुषाेत्तम ठाकरे उपस्थित हाेते.
रविवारपासून गावातील नानाजी म्हस्के, नानाजी लडके, सुमित्रा चव्हाण, पुरुषाेत्तम ठाकरे यांच्या शेतात मजगीची कामे सुरू झाली. एकूण ४०० वर लाेकांना हंगामी राेजगार या माध्यमातून प्राप्त झाला. चार शेतकऱ्यांच्या मजगी कामानंतर शेतकरी वासुदेव बावणे, भूषण देशमुख, वसंत चापले, रमेश सिडाम, रुमाजी चिनेकार, पुष्पा मेश्राम, सुरेश ठाकरे, दुधराम चनेकार, बाबूराव चिकराम आदींच्या शेतात मजगीची कामे हाेणार आहेत. यामुळे पुन्हा महिनाभर गावातील मजुरांना राेजगार उपलब्ध हाेणार आहे. काेविडच्या नियमांचे पालन करून मजगीची कामे केली जात आहेत.
===Photopath===
130521\13gad_7_13052021_30.jpg
===Caption===
मजगी कामाचा शुभारंभ करताना सरपंच सूरज उईके.