शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री प्रशिक्षण शिबिरातून बेरोजगारांना रोजगार; १३९ उमेदवारांपैकी ५४ जणांना मिळाली नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:33 IST

Gadchiroli : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिबिराचे यशस्वी आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिबिराचे आयोजन २४ ऑगस्ट रोजी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. या शिबिरातून बेरोजगारांना रोजगार प्राप्त होत आहे. यावेळी उपस्थित १३९ उमेदवारांपैकी ५४ जणांना नियुक्ती मिळाली.

या मेळाव्याला पदवीधर शिक्षक / प्राथमिक शिक्षक व डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरिता पात्र उमेदवारास बोलावण्यात आले. या शिबिराला पदवीधर शिक्षक २९, प्राथमिक शिक्षक ९५ व डाटा एन्ट्री ऑपरेटर ४४ असे एकूण १३९ उमेदवार उपस्थित होते. उपस्थित उमेदवारांमधून शिबिराला पदवीधर शिक्षक २०, प्राथमिक शिक्षक २७ व डाटा एन्ट्री ऑपरेटर ७ असे एकूण ५४ पात्र झालेले आहेत. कोरची तालुक्यात प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणार्थी ६६ जागा रिक्त असून या रिक्त जागेसाठी सुशिक्षित बेरोजगार अध्यापक पदविका उमेदवारांनी ३१ ऑगस्टपर्यंत पंचायत समिती कार्यालयात आपले अर्ज सादर करावे, असे गटशिक्षणाधिकारी अमित दास यांनी यावेळी सूचित केले.

गटशिक्षणाधिकारी अमित दास यांनी उपस्थित उमेदवारास भरती प्रक्रियेचे निकष, नियुक्ती कुठे व इतर बाबीवर मार्गदर्शन केले. शिबिराला विषयतज्ज्ञ शिवाजी वाघमारे, साधन व्यक्ती विनायक लिंगायत, साधन व्यक्ती प्रमोद वाढणकर, मीना शहारे, रोशना बावनकुळे, साधन व्यक्ती योगेंद्र शुक्ला, युवराज मोहनकर, कुणाल कोचे, फामेश्वर नाटके हजर होते.

कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन बेरोजगारीवर मात करा

  • ग्रामीण भागातील युवक- युवतींनी कौशल्यावर आधारित शिक्षण घेऊन बेरोजगारीवर मात करावी. कौशल्यपूर्ण शिक्षणातून स्वयंरोजगारही उभारता येतो, असे मान्यवरांनी सांगितले.
  • अलिकडे उद्योगाला कौशल्यपूर्ण व प्रशिक्षित उमेदवारांची आवश्यकता आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण न घेता कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे आवाहन केले.
टॅग्स :government schemeसरकारी योजनाMaharashtraमहाराष्ट्रGadchiroliगडचिरोली