शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कोरोनाच्या सावटात कर्मचाऱ्यांचे कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी मागील १० वर्षांपासून विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर काम करीत आहेत. त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. आरोग्य विभागातील विविध पदांची जबाबदारी कंत्राटी तत्त्वावर असलेले अधिकारी व कर्मचारी सक्षमरित्या पार पाडत आहेत. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांची शासकीय नोकरी लागण्याची वयोमर्यादा निघून गेली आहे.

ठळक मुद्देएनएचएम कर्मचाऱ्यांचे गुरूवारपासून आंदोलन : सेवेत कायम करण्याची मागणी; आरोग्य सेवा विस्कटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी/कुरखेडा : शासन सेवेत बिनशर्त सामावून घ्यावे या मुख्य मागणीसाठी एनएचएम कर्मचाºयांनी ११ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने आरोग्य व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी मागील १० वर्षांपासून विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर काम करीत आहेत. त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. आरोग्य विभागातील विविध पदांची जबाबदारी कंत्राटी तत्त्वावर असलेले अधिकारी व कर्मचारी सक्षमरित्या पार पाडत आहेत. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांची शासकीय नोकरी लागण्याची वयोमर्यादा निघून गेली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून सदर कर्मचारी करीत आहेत. आजपर्यंत अनेकवेळा लोकशाही मार्गाने आंदोलने केली आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. सध्या राज्यभरात कोविड-१९ या आजाराची साथ पसरली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही बिकट परिस्थिती आहे. तरीही एनएचएम कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा देत आहेत. एनएचएम कर्मचाºयांच्या मागणीचा विचार करून त्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी गुरूवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याने रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आष्टी येथील एनएचएम कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देऊन कामबंद आंदोलन सुरू केले. निवेदन देतेवेळी डॉ.प्रशांत धाकडे, डॉ.मृणालीनी उईके, श्रीदेवी पुप्पलवार, आशा सोनवाने, करिष्मा पेरमवार, मनोज बघमारे, गेमचंद गोंगले हजर होते. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.देसाईगंजात निवेदनदेसाईगंज - येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. कामबंद आंदोलनात संगीता सरदार, कुंदा सहारे, किरण शिंदे, अरूण खरमाटे, अशोक जयसिंगपुरे, बाजीराव कांबळे, दिलीप उटाणे या एनएचएमच्या कर्मचाºयांनी सहभाग घेतला आहे.कुरखेडातील कर्मचारी आंदोलनावरकुरखेडा - उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संभाजी ठाकर यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठविले. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बांबोळे, हेमंत बोरकर, विनोद दुफारे, धम्मप्रिया झाडे, टिकेश्वरी करमकर, शुभांगी गहाणे, ममता कन्नाके, निशा चचाणे, डॉ.जगदीश राऊत, डॉ.प्रिया जुमनाके, डॉ.अर्चना ठलाल, डॉ.योगेश मानकर, डॉ.स्नेहा कृपाल, डॉ.तुषार बावनकुडे, फाजिल शेख, स्वाती मांडरे, चेतना भैसारे, अस्मिता सुरपाम, प्रियंका म्हशाखेत्री, मेघा राणे, कल्पना भट्ट, रश्मी मोगरे, सुषमा झंझाळ, आनंद नैताम, जावेद शेख, इरफान खान, प्रियंका धमगाये हजर होते.

टॅग्स :Socialसामाजिक