शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मंगलाचा मुक्त विहार भंगला... मग संतापली अन् दुचाकी पायाखाली चिरडली

By संजय तिपाले | Updated: June 25, 2023 12:56 IST

कमलापूर कॅम्पमधील घटना: व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

संजय तिपाले, गडचिरोली : राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प गडिचरोलीतील कमलापूर (ता. अहेरी) येथे आहे. या कॅम्पमध्ये मुक्त विहार करत असलेल्या मंगला हत्तीणीला एका अतिउत्साही दुचाकीस्वार तरुणाने डिवचले. त्यामुळे तिचा पारा चढला, मग तिने सोंडेने दुचाकी खाली पाडली अन् पायाखाली चिरडली. २४ जूनला सायंकाळी ही घटना घडली.

कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये एूण आठ हत्ती आहेत. या हत्तींचे वनविभागाकडून पालन- पोषण केले जाते. दररोज सायंकाळी या हत्तींना कॅम्पमध्ये मोकळे सोडले जाते. दरम्यान, २४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता एका दुचाकीस्वार तरुणाने कमलापूर-दामरंचा रस्ता ओलांडताना मंगला हत्तीणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तिच्या जवळ जाऊन वेगवेगळे आवाज काढले व हातवारे करुन तिच्या विहारात व्यत्यय आणला. त्यामुळे मंगला हत्तीण चवताळली. तिने सोंड पुढे केल्यावर दुचाकी सोडून तरुणाने पळ काढला. त्यानंतर हत्तीणीने सोंडेने दुचाकी फिरवली व पायाखाली चिरडली. हा सर्व प्रकार तेथे उपस्थित इतर तरुणांनी मोबाइलमध्ये कैद केला. याची चित्रफित सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पर्यटनप्रेमींनी व्यक्त केली नाराजी

दरम्यान, कमलापूर कॅम्पमध्ये हत्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील हा एकमेव कॅम्प असून तेथे पर्यटकांची रेलचेल वाढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, काही अतिउत्साही तरुण हत्तीला डिवचण्याचा प्रयत्न करतात. त्यातून असे प्रकार होतात. आतापर्यंत या कॅम्पमध्ये हत्तीने कोणावरही हल्ला केल्याची घटना घडलेली नाही. मात्र, शनिवारी तरुणाने केलेल्या उपद्व्यापामुळे पर्यटनप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.   

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली