शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड-तेलंगणातील निवडणूक : सीमावर्ती भागात पोलीस सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 18:45 IST

नक्षलग्रस्त छत्तीसगड आणि तेलंगणात येत्या महिनाभरानंतर होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या हद्दीतही पोलिसांनी सतर्क होऊन बंदोबस्त वाढविला आहे.

 गडचिरोली  - नक्षलग्रस्त छत्तीसगड आणि तेलंगणात येत्या महिनाभरानंतर होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या हद्दीतही पोलिसांनी सतर्क होऊन बंदोबस्त वाढविला आहे. निवडणुकीसारख्या लोकशाही प्रक्रियेला नक्षलवाद्यांचा विरोध असतो. त्यामुळे निवडणुकीदरम्यान दोन्ही राज्यात त्यांच्या कोणत्याही घातपाती कारवाया यशस्वी होऊ नये यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे सी-६० पथक आणि केंद्रीय राखीव पोलीस दल नक्षलींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

याच आठवड्यात नागपूरमध्ये तीनही राज्यांच्या पोलीस दलांचे अधिकारी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर सीमावर्ती भागात पोलीस दल अधिक सक्रिय झाले. छत्तीसगड किंवा तेलंगणात कारवाया करून नक्षलवादी गडचिरोलीच्या हद्दीतील जंगलात आश्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचे हे मनसुबे यशस्वी होणार नाहीत यासाठी पोलीस दल प्रयत्नशिल आहे.डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात छत्तीसगड आणि तेलंगणात विधानसभेची निवडणूक होत आहे. तेलंगणात नक्षलींचे अस्तित्व पूर्वीपेक्षा बरेच कमी झाले असले छत्तीसगड राज्यातील महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये नक्षलींचे प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सीमावर्ती भागात नक्षलींच्या अस्तित्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्र