शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात आठ ट्रॅक्टर सागवानाचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:50 IST

अहेरी तालुक्यातील जामगाव येथील नागरिकांकडून जवळपास १० लाख रुपये किमतीचे सुमारे आठ ट्रॅक्टर सागवानी लाकडाचे साहित्य आढळून आले आहे.

ठळक मुद्देजामगाव येथे कारवाई१० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी तालुक्यातील जामगाव येथील नागरिकांकडून जवळपास १० लाख रुपये किमतीचे सुमारे आठ ट्रॅक्टर सागवानी लाकडाचे साहित्य आढळून आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवानाचे साहित्य आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.जामगाव हे गाव आलापल्ली-आष्टी मार्गावरील चिंतलपेठ फाट्यापासून सात किमी अंतरावर आहे. सदर गाव पेडीगुड्डम वन परिक्षेत्रांतर्गत येते. जामगाव येथे मोठ्या प्रमाणात सागवान झाडांची तोड करून त्यापासून पाट्या, पलंग, दरवाजे, खिडक्या व अन्य साहित्य बनविले जात असल्याची गोपनिय माहिती वन विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार वन विभागाच्या जवळपास ६० ते ७० कर्मचाऱ्यांनी १ एप्रिल रोजी जामगाव गाठून तेथील नागरिकांच्या घरांची तपासणी करण्यास सुरूवात केली. पहिल्या दिवशी जवळपास दोन ट्रॅक्टर सागवाने साहित्य आढळून आले. रात्री उशीर झाल्याने कारवाई थांबवून पुन्हा दुसऱ्या दिवशी २ एप्रिल रोजी तपासणी सुरू केली. दुसऱ्या दिवशीही काही नागरिकांच्या घरी सागवानी साहित्य आढळून आले. पुन्हा तिसºया दिवशी ३ एप्रिल रोजी जामगाव परिसरातील शेतशिवार व नाल्यांमध्ये सागवानी साहित्य आढळून आले. वन विभागामार्फत तपासणी मोहीम सुरूच असून ३ एप्रिलपर्यंत सुमारे आठ ट्रॅक्टर सागवानी साहित्य जप्त करण्यात आले आहे.१ एप्रिल रोजी कारवाई झाल्यानंतर काही नागरिकांनी घरामध्ये लपवून ठेवलेले साहित्य गावाच्या जवळ असलेल्या नाल्यांमध्ये फेकून दिले. सदर साहित्य सुध्दा जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत आठ ट्रॅक्टर सागवानाचे साहित्य व लाकूड आढळून आले आहेत. त्यांची किंमत जवळपास १० लाख रुपये एवढी होते. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून सात आरोपी फरार आहेत. वन विभागामार्फत तपासणी मोहीम सुरूच आहे.२४ मार्चपासून शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. याचा गैरफायदा उचलत जामगाव येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून विविध प्रकारचे साहित्य बनविण्यास सुरूवात केली होती. विशेष म्हणजे, वन विभागाचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्यांना कोरोनाशी संबंधित कोणतेही काम सोपविण्यात आले नव्हते. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या ही बाब कशी काय लक्षात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी