शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

शिक्षण हे प्रगतीचे द्वार, प्रत्येकाने जिद्दीने प्रयत्न करून यश संपादन करावे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

By संजय तिपाले | Updated: July 5, 2023 14:23 IST

गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ थाटात : अर्पिता, सारिका, अन्सारी, हलामी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार

गडचिरोली : आदिवासींचे निसर्गाशी वर्षानुवर्षांचे नाते आहे. निसर्गाशी जुळवून  घेत त्यांनी जीवन जगण्याची कला साध्य करत आपली संस्कृती व परंपरा जपली आहे. गोंडवाना विद्यापीठातील विविध उपक्रमांतून आदिवासी मुले- मुली शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. शिक्षण हेच प्रगतीचे द्वार असून प्रत्येकाने जिद्दीने प्रयत्न करुन प्रगती करावी, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

येथील गोंडवाना विद्यापीठात दहावा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरात ५ जुलै रोजी सकाळी पार पडला. यावेळी राज्यमाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांची उपस्थिती होती. सकाळी पावणे अकरा वाजता मान्यवरांचे मंचावर आगमन झाले. तत्पूर्वी विद्यापीठ परिसरातून कार्यक्रमस्थळापर्यंत शैक्षणिक शोभायात्रा काढण्यात आली होती.

कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अमित रामरतन गोहणे, अर्पिता पुरुषोत्तम ठोंबरे, हलामी लोकेश श्रीराम, अन्सारी सदाफ नसीफ अहमद , संतोष प्रकाश शिंदे व सारिका बाबूराव मंथनकार या गुणवंतांचा   सुवर्णपदक पटकावल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पदवीप्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  गोगाव (अडपल्ली) येथील १७७ एकरवरील नियोजित विद्यापीठ कॅम्पसच्या कोनशिलेचे व्हर्च्यूअल पध्दतीने अनावरण करण्यात आले.

राज्यपाल रमेश बैस यांनी सुवर्णपदकविजेत्या व दीक्षांत समारंभात गौरविलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक रहा, असा उपदेश केला. कार्यक्रमाची सुरुवात व समारोप राष्ट्रगीताने झाला. यावेळी विद्यार्थी,  प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरासह कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

गडचिरोलीत विमानतळासाठी प्रयत्न : फडणवीस

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोली हा जल, जमीन, जंगल याबाबतीत संपन्न जिल्हा आहे. येथे लोहखनिजासह बांबू व इतर वनउपज मोठ्या प्रमाणात आहेत. नवीन स्टील कंपन्या येत आहेत, २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यापुढेही उद्योग, व्यवसाय वाढावेत व इथल्या साधन, सामुग्रीच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा, त्यांची प्रगती व्हावी, यासाठी  निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली आहे. लवकरच विमानतळासाठीही प्रयत्न करु. माओवाद्यांचा प्रभाव आता कमी होत आहे, त्यामुळे जिल्ह्याची प्रगती होईल, असे त्यांनी सांगितले.

रेल्वेसाठी पाठपुरावा सुरु

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, २०१४ पूर्वी गडचिरोलीत दळणवळणाचा मोठा प्रश्न होता. तेव्हा केवळ ९२ किलोमीटर महामार्ग होता, आता महामार्गांचे जाळे तयार झाले आहे. २०२४ पूर्वी १० हजार कोटींपर्यंतची कामे करायची आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योग, प्रकल्पासाठी येथे वाव आहे. त्यासाठी रेल्वे आवश्यक असून रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठGadchiroliगडचिरोलीDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू