शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आइसगोळा, पाणीपुरी खाताय..? जरा जपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:17 IST

Gadchiroli : बर्फ शुद्ध असेलच याची शाश्वती अजिबात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : उन्हाळा आला की शीतपेय विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत कुणालाच शंका येत नाही. उन्हाची काहिली शमविण्यासाठी बर्फाचा गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान- मोठ्यांची गर्दी पाहायला मिळते, परंतु बर्फगोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे.

काही बर्फ कारखान्यात दूषित पाण्यापासून तयार करण्यात येतो. अशा कारखान्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाने वारंवार तपासणी करावी, अशी मागणी आहे. पाणीपुरीदेखील कुठेही मिळते. पण त्यातील पाणी, ते पदार्थ देणारे यांची स्वच्छता तेवढीच महत्त्वाची असते. अनेकदा डॉक्टर असे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत, असा सल्ला देतात. रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून गोळा व आइस कॅन्डी तयार केली जाते. निम्न दर्जाचा रंग आणि सॅकरीनचा विक्रेते उपयोग करतात. बर्फगोळे ठेल्यावर नेहमीच अस्वच्छता असते. त्यातच गोळा तयार करताना बर्फ लोखंडाच्या ब्लेडमधून किसला जातो. या ठेल्यावर बऱ्याचदा रासायनिक रंगांच्या बाटल्या उघड्यावर ठेवलेल्या असतात. अशुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फ आजाराला आमंत्रण देणारा आहे. त्यामुळे पोटाचे विकार, कावीळ, डायरिया आणि संसर्ग होण्याची शक्यता असते. या आजारांचे प्रमाण उन्हाळ्यात अशुद्ध बर्फाचे सेवन केल्यामुळे वाढते. लग्नात बर्फ टाकलेले पाणी पिऊ नये. रस्त्यावर बर्फमिश्रित रस आणि अन्य पदार्थ खाऊ नयेत

पाणीपुरीतून गॅस्ट्रोचा धोका• पाणीपुरीमध्ये पाण्याचे महत्त्व जास्त असून, अस्वच्छ, घाण पाणी असेल तर ते पोटात जाऊन इन्फेक्शन होऊन व्यक्ती आजारी पडू शकते. त्यामुळे अस्वच्छ ठिकाणी असलेल्या गाड्यांवरील पाणीपुरी खाऊ नये. • पाणीपुरी देणारी व्यक्ती तासनतास हातगाड्यांवर उभी राहते. उन्हातान्हात असल्याने प्रचंड घाम येतो.• स्वच्छ पाण्याने हात धुतातच असे नाही, त्याच हाताने पाणीपुरी देतात. त्यामुळे आजार होऊ शकतो.

साफसफाई असलेल्या ठिकाणीच खाद्य खावे. स्वच्छ पाणी प्यावे. गॅस्ट्रोचा फार त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. मयुरी गोंगले, आरमोरी 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाGadchiroliगडचिरोली