जिल्हा वाहतूक सुरक्षा समितीच्या रेकॉर्डनुसार जिल्ह्यात सध्या दोनच ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघातप्रवण स्थळ) आहेत. त्यापैकी एक सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली मार्गावर असलेले आरडा आणि दुसरा कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथे आहे. याठिकाणी अनेक अपघात होऊन बऱ्याच जणांचा जीव गेला आहे. याशिवाय अपघातप्रवण ठिकाणे आहेत. जिल्हा वाहतूक सुरक्षा समितीने नव्याने आढावा घेऊन इतरही ब्लॅक स्पॉट निश्चित करणे गरजेचे झाले आहे.
ब्लॅक स्पॉटवर अनेक बळी
जिल्ह्यातील २ ब्लॅक स्पॉटसह इतरही ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपघाताचे प्रमाण कमी झाले आहेत. याशिवाय मृतांची संख्याही कमी झाली आहे. कोरोनाकाळातील लॉकडाऊनचा हा परिणाम आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यातील अपघातांमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला, तर २०२० मध्ये १४२ जणांनी जीव गमावला आहे. रस्ते दुरुस्तीसोबत वाहतूक नियमांबाबत वाहनधारकांमध्ये शिस्त आल्यास अपघात टाळता येऊ शकतात.
दुचाकीतील बळींची संख्या जास्त
वर्षभरातील अपघातांमध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याच अपघातातील मृत्यूंचेही प्रमाण जास्त आहे. कारण अपघातग्रस्त दुचाकीस्वारांनी डोक्यावर हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे मेंदूला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. असे असतानाही हेल्मेटचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या अजूनही नगण्य आहे.
जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट २
२०२० मध्ये झालेले अपघात २३१
अपघातातील एकूण मृत्यू १४२