शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

असमतोल पावसाने धान रोवण्या लांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 22:11 IST

यावर्षीचा पाऊस असमतोल पडत आहे. त्यामुळे धान पिकाच्या रोवण्या लांबणीवर पडणार आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी या कालावधीत धानाच्या रोवण्यांना सुरूवात झाली होती. यावर्षी मात्र काही शेतकऱ्यांचे अजुनही धानाचे पऱ्हे टाकून झाले नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना प्रतीक्षा : केवळ पाच टक्के रोवणीची कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीचा पाऊस असमतोल पडत आहे. त्यामुळे धान पिकाच्या रोवण्या लांबणीवर पडणार आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी या कालावधीत धानाच्या रोवण्यांना सुरूवात झाली होती. यावर्षी मात्र काही शेतकऱ्यांचे अजुनही धानाचे पऱ्हे टाकून झाले नाही. ज्यांचे पऱ्हे रोवण्याजोगे झाले आहेत, आता पावसाने उसंत दिल्याने धानाची रोवणी करणे अशक्य झाले आहे. आतापर्यंत केवळ पाच टक्के क्षेत्रावरच रोवण्या आटोपल्या आहेत.यावर्षी पाऊस उशीरा आला. जेव्हापासून पावसाला सुरूवात झाली, तेव्हापासून सातत्याने पाऊस पडत होता. पावसात पेरण्या करणे शक्य होत नाही. सोयाबिन, कापूस, पिकासह धानाचे पऱ्हे टाकण्यासही विलंब झाला. काही शेतकऱ्यांनी तर अजूनपर्यंत पऱ्हेच टाकले नाहीत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यांनी पावसाची प्रतीक्षा न करता जून महिन्यातच धानाचे पऱ्हे टाकले. त्या शेतकऱ्यांनी पाऊस सुरू होताच रोवणीच्या कामाला सुरूवात केली. मोठ्या प्रमाणात मजूर मिळत असल्याने त्यांची रोवणी आटोपण्याच्या मार्गावर आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांचे धानाचे पऱ्हे टाकण्यास विलंब झाला. सतत पाऊस पडत असतानाही काही शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. त्यांचे पऱ्हे आता रोवणीजोगे झाले आहेत. मात्र पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने धानाच्या बांध्यांमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. जोपर्यंत मोठा पाऊस येणार नाही, तोपर्यंत धानाची रोवणी सुरू होणार नाही.मागील वर्षी वेळेत पाऊस पडला होता. त्यामुळे धानाचे पऱ्हे टाकणे व रोवण्याची कामे अगदी वेळेत सुरू झाली होती. मागील वर्षी जुलै महिन्यातच रोवण्यांना सुरूवात झाली होती. वेळेवर रोवण्या झाल्याने उत्पादनही चांगले झाले होते. यावर्षी मात्र रोवणी लांबणार असल्याने धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेवटी पाऊस न पडल्यास धान पीक करपण्याची शक्यता असल्याने शेतकºयांनी कमी व मध्यम कालावधीत येणाऱ्या धानाची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे.आवत्या पद्धतीने धान लागवडीवर भरआवत्या पध्दतीने धानाची लागवड केल्यास उत्पादन कमी होते. मात्र उत्पादन खर्च सुध्दा कमी आहे. यावर्षी पाऊस विलंबाने पडला. त्यामुळे रोवण्या लांबल्या आहेत. धान परिपक्व होण्याच्या शेवटच्या कालावधीत पाऊस न झाल्यास धानपीक करपण्याची शक्यता राहते. त्यामुळे परिपक्व होण्याच्या मार्गावर असलेले धानपीक करपल्यास शेतकऱ्याचे पूर्ण उत्पन्न बुडते. उलट तोट्याचा सामना करावा लागतो. याचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी आवत्या पध्दतीने धान लागवड करण्यास विशेष भर दिला आहे. विशेष करून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात आवत्या टाकले आहेत.जलसाठे कोरडेचअजूनपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तलाव व इतर जलसाठे अजुनही कोरडेच आहेत. धान पिकाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. पाऊस न झाल्यास धानपीक करपण्याची भिती आहे. विहिरींनाही अजूनपर्यंत पुरेसे पाणी आले नाही.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती