शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा तुपाशी, महाराष्ट्र उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 21:38 IST

Gadchiroli News गोदावरी नदीवर तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या महत्त्वाकांक्षी मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. या पाण्यातून वर्षाकाठी दोनच नाही तर तीन पिके घेऊन त्या भागातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहेत.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून सिंचनाचे नियोजनच नाही

 

गडचिरोली : तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवरील गोदावरी नदीवर तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या महत्त्वाकांक्षी मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. या पाण्यातून वर्षाकाठी दोनच नाही तर तीन पिके घेऊन त्या भागातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या हद्दीतील शेतकऱ्यांना एकही थेंब पाणी सिंचनासाठी घेण्याचे नियोजन राज्य सरकारने केले नसल्यामुळे हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यासाठी ‘पांढरा हत्ती’ ठरत आहे.

तब्बल ८५ गेट असलेला हा मेडीगड्डा बॅरेज तेलंगणा सरकारने अवघ्या तीन ते साडेतीन वर्षात बांधून पूर्ण केला. या भल्यामोठ्या प्रकल्पाचे पाणी थेट हैदराबादपर्यंत नेले जात आहे. तेलंगणातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. या बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात महाराष्ट्राच्या हद्दीतील १५ पेक्षा अधिक गावे आली आहेत. पावसाळ्यात बॅरेजचे गेट उघडले जातात त्यावेळी सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरून पिके व सुपिक माती खरडून निघते. याशिवाय पाणी अडविणे सुरू होते त्यावेळी गोदावरी आणि प्राणहिता नदीचे बॅकवॉटरही शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरते. मेडीगड्डाला जाऊन मिळणाऱ्या गोदावरी आणि प्राणहिता नद्यांवर उपसा सिंचन योजना उभारल्यास त्या पाण्याने सिरोंचा तालुक्यातील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते.

दरम्यान, पुष्कर मेळ्याच्या निमित्ताने सिरोंचात गेलेले गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे काही शेतकऱ्यांनी याकडे लक्ष वेधले. त्यामुळे त्यांनी बॅरेजला भेट देऊन प्रकल्पाचे मुख्य अभियंता विश्वकर्मालू, तिरुपती राव, उपअभियंता रवी जलसा यांच्यासोबत चर्चा करून राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. यावेळी जि.प.चे माजी कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, भाजपचे पदाधिकारी दामोधर अरगेलीवार, कृउबा समितीचे उपसभापती सतीश गंजीवार, संदीप राचर्लावार, शारीख शेख, रमेश अधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार

वनकायद्याची अडचण पुढे करत शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवणे योग्य नाही. राज्य सरकारने रमेशगुडम, पेंटीपाका, झिंगानूर येथे उपसा सिंचन प्रकल्प उभारल्यास गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही त्या पाण्याचा फायदा होईल. यासंदर्भात, जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करणार असून विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करणार, अशी प्रतिक्रिया आ. डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waterपाणी