शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जात वैद्यता प्रमाणपत्र सादरच न केल्याने शिवसेना नगरसेवक अपात्र

By admin | Updated: March 18, 2017 02:09 IST

कोरची नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामाप्रसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर

दीड वर्ष उलटले : कोरची नगर पंचायत कोरची : कोरची नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामाप्रसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक अरूण नायक यांनी दीड वषार्पासून जात वैद्यता प्रमाण पत्र सादरच न केल्याने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी गुरूवारी त्यांना अपात्र घोषित केले. या बाबतचा आदेश प्राप्त झाल्याची माहिती कोरची नगर पंचायत मुख्याधिकारी आशीष चव्हाण यांनी दिली. नगर पंचायत कोरची येथील २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक अरूण विष्णु नायक यांनी प्रभाग क्रमांक सहा नामाप्र या प्रवगार्तून शिवसेना पक्षाच्या निवडणुक चिन्हावर निवडणुक लढविली होती. त्या निवडणुक नामनिर्देशन अर्जाला नायक यांनी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती चंद्रपुर यांच्याकडे जात पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची पावती जोडीली होती. या पावतीच्या भरावरशावर त्यांना निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली. दरम्यान आक्टोबर २०१५ च्या नगर पंचायत निवडणुकीत अरूण नायक प्रभाग सहा मधून निवडून आले आले. निवडून आल्यापासून सहा महिनाच्या आत जात वैद्यता प्रमाण पत्र सादर करणे अनिवार्य असताना देखील जात वैद्यता प्रमाणपत्र सादरच केलेले नसल्याने मुख्याधिकारी नगर पंचायत कोरची यांनी त्यांना १० जून २०१६ ला जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत नोटीस बजावली होती. तरीही नगरसेवक अरूण नायक यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर केलेला नव्हते. त्यानंतर मुख्याधिकारी नगर पंचायत कोरची यांनी सदर नोटीसीचा संदर्भ देऊन २५ जानेवारी २०१७ ला १३ जून २०१६ ला त्यांना नोटीस बजाविली होती. त्यानंतर त्यांच्या विरूध्द अपात्र कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. नगरसेवक अरूण नायक यांना जिल्हाधिकारी कार्यालय गड़चिरोली यांनी १५ फेब्रुवारी २०१७ ला पत्र देऊन तीन दिवसाच्या आत जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करावे, असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही त्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे १६ मार्च २०१७ ला त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला व या संदर्भातील आदेश गुरूवारी कोरची नगर पंचायतीला धडकला. शिवसेनेच्या एका नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द झाल्याने आता कोरची नगर पालिकेतील पक्षीय बलाबल समसमान झाले आहे. शिवसेनेचे पाच, भाजपचे तीन, काँग्रेस, राकाँ व विकास आघाडीचे आठ संख्याबळ झाले आहे.सदस्यत्व रद्द झाल्याने खळबळ उडाली आहे.