लोकमत न्यूज नेटवर्कघोट : रेगडी-देवदा मार्गावर असलेल्या दिना नदीवर पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे ४० ते ४५ किमीचा फेरा करून गाव गाठावे लागते.रेगडी-देवदा हा मार्ग एटापल्ली तालुक्याला जोडला आहे. या मार्गाने एटापल्ली येथे कमी अंतरात पोहोचता येत असल्याने चामोर्शी, घोट, रेगडी परिसरातील अनेक नागरिक, कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. रेगडी व देवदा या दोन गावांमध्ये सहा किमीचे अंतर आहे. या मार्गाने वाहनांची वर्दळ राहत असल्याने दोन्ही बाजूने दिना नदीपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र नदीपात्रातून पुलाचे बांधकाम झाले नसल्याने दोन्ही बाजूचे प्रवाशी नदी किनाऱ्यावर वाहने ठेवून पाणी कमी असल्यास पायदळ प्रवास करतात. तर कधी डोंग्याने प्रवास केला जाते. या ठिकाणावरून दिना नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. त्यामुळे नदीपात्रातून पाणी असताना प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते. तरीही नागरिक, कर्मचारी या मार्गाने वर्षभर प्रवास करतात.काही प्रवाशी धोकादायक प्रवास करण्याऐवजी घोट-मुलचेरा-देवदा असा प्रवास करतात. या मार्गाने गेल्यास ४० ते ४५ किमीचा फेरा पडते. त्यामुळे दिना नदीवर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यात जवळपास १२५० मिमी पाऊस पडते. जवळपास आठ महिने नदीपात्रातून पाणी वाहत राहते. त्यामुळे या नदीवर पूल बांधल्याशिवाय पर्याय नाही. नागरिकांनी पूल बांधण्यासाठी शासनाकडे अनेकवेळा मागणी केली आहे.पूल मंजुरीसाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षरेगडी-देवदा मार्गावरून होणारी वाहतूक लक्षात घेतली तर या ठिकाणावरून पूल होणे आवश्यक आहे. पुलाअभावी नागरिक व कर्मचाऱ्यांना नदीपात्रातून पाणी असतानाही धोकादायक प्रवास करावा लागते. त्यामुळे या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्याबाबत चामोर्शी व एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधींकडे निवेदन सादर केले आहे. मात्र अजूनपर्यंत पूल बांधकामाला निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता पुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र यातून रेगडीचा पूल वगळण्यात आला आहे. पुलाची गरज लक्षात घेता या ठिकाणी पूल मंजूर करणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.
देवदा पुलाअभावी ४५ किमींचा होतो फेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST
रेगडी-देवदा हा मार्ग एटापल्ली तालुक्याला जोडला आहे. या मार्गाने एटापल्ली येथे कमी अंतरात पोहोचता येत असल्याने चामोर्शी, घोट, रेगडी परिसरातील अनेक नागरिक, कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. रेगडी व देवदा या दोन गावांमध्ये सहा किमीचे अंतर आहे. या मार्गाने वाहनांची वर्दळ राहत असल्याने दोन्ही बाजूने दिना नदीपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे.
देवदा पुलाअभावी ४५ किमींचा होतो फेरा
ठळक मुद्देदिना नदीवर पूल आवश्यक : पावसाळ्यात धोकादायक प्रवास