शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

गटार, घरकुलांमुळे अर्थसंकल्प दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:13 IST

गडचिरोली शहरातील दोन अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठ्या योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमिगत गटार योजनेचे २५ कोटी रूपये व प्रधानमंत्री आवास योजनेचे सुमारे ६७ कोटी रूपये प्राप्त झाल्याने मागील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच .....

ठळक मुद्देगडचिरोली नगर परिषद : १६० कोटी ३३ लाख रूपयांचे बिग बजेट सादर

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली शहरातील दोन अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठ्या योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमिगत गटार योजनेचे २५ कोटी रूपये व प्रधानमंत्री आवास योजनेचे सुमारे ६७ कोटी रूपये प्राप्त झाल्याने मागील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच गडचिरोली शहराचे अंदाजपत्रक दुपटीने वाढले आहे. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच अंदाजपत्रक १०० कोटींच्यावर गेले आहे. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पडलेल्या सभेत सदर अंदाजपत्रकाला मंजुरी प्रदान करण्यात आली.अर्थसंकल्पात महसुली जमामध्ये २०१८-१९ ची प्रारंभीची शिल्लक ५ लाख १६ लाख २९ हजार ४०३ रूपये दाखविण्यात आली आहे. नगर परिषदेला स्वत:च्या उत्पन्नातून सुमारे २९ कोटी ९२ लाख ३० हजार रूपये उत्पन्न मिळणार आहे. प्रारंभीची शिल्लक व २०१८-१९ मध्ये प्राप्त होणारे उत्पन्न असे एकूण ३५ कोटी ८ लाख ५९ हजार ४०३ रूपये एकूण महसुली जमा राहणार आहे. २०१८-१९ मध्ये एकूण ३५ कोटी ५ लाख १४ हजार रूपये खर्च होणार आहेत. एकूण शिल्लक ३ लाख ४५ हजार ४०३ रूपये राहणार आहे.सुरुवातीची भांडवली जमा १७ कोटी ४३ लाख २८ हजार ६७० रूपये आहे. शासनाकडून विविध अनुदानांच्या माध्यमातून सुमारे १०७ कोटी ९० लाख रूपये प्राप्त होणार आहेत. एकूण भांडवली जमा १२५ कोटी ३३ लाख २८ हजार ६७० रूपये राहणार आहे. एकूण भांडवली खर्च १२५ कोटी २८ लाख ५० हजार रूपयांचा आहे. भांडवली जमेतून खर्च वगळता ४ लाख ७८ हजार ६७० रूपये शिल्लक राहणार आहेत.गडचिरोली शहराला दरवर्षी साधारणपणे १० ते २० कोटी रूपयांपर्यंत शासनाकडून विविध योजनांसाठी अनुदान प्राप्त होत होते. २०१४-१५ या वर्षात शासनाकडून ९ कोटी ३८ लाख, २०१५-१६ मध्ये १५ कोटी २१ लाख, २०१६-१७ मध्ये ४ कोटी ८८ लाख व २०१७-१८ मध्ये जवळपास ६३ कोटी ९८ लाख रूपयांचे अनुदान प्राप्त होत होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गडचिरोली शहरात जवळपास १ हजार २०० घरांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी शासनाकडून सुमारे ६७ लाख रूपये उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर गडचिरोली शहरात भूमिगत गटार योजनेसाठी २५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या दोनच योजनांच्या निधीची बेरीज १०० कोटींचा आकडा पार करीत आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच गडचिरोली शहराचा अर्थसंकल्प सुमारे १६० कोटी ३३ लाख रूपयांचा मांडण्यात आला आहे. सदर अर्थसंकल्पीय सभेला पालिकेतील सर्व सभापती, नगरसेवक, मुख्याधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रमुख बाबींवरील खर्च२०१८-१९ च्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने फर्निचर खरेदीवर ४ लाख ५० हजार, संगणक खरेदीसाठी १५ लाख, पंचवार्षिक कर आकारणी ठेका देण्यासाठी ५० लाख रूपये, विद्युत दिव्यांची देखभाल व दुरूस्तीवर ३५ लाख रूपये, बोअरवेल दुरूस्तीसाठी ३० लाख रूपये, नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी १० लाख रूपये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एक कोटी रूपये, फिल्टर दुरूस्तीसाठी ३.२५ लाख रूपये, जीपीएस यंत्रणेकरिता पाच लाख रूपये, सफाई कामगारांना घरे बांधून देण्यासाठी १० लाख रूपये, दुर्बल, महिला व बालकल्याणसाठी २ लाख ५८ हजार रूपये, ट्रिगार्ड खरेदीसाठी १० लाख रूपये, लहान मुलांचे खेळणी व गार्डन चेअरसाठी १० लाख रूपये, भूसंपादनसाठी २० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.उत्पन्न वाढीच्या दृष्टीने कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. शासनाकडून प्राप्त झालेले २० कोटी रूपये सभागृहाची परवानगी न घेताच अ‍ॅक्सिस बँकेत फिक्स डिपोझिट केले आहेत. सदर रक्कम राष्टÑीयकृत बँकेत जमा करावी. एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ट्रीगार्ड खरेदीवर ४ लाख ५९ हजार रूपये खर्च झाल्याचे दाखविले आहे. मात्र छत्रपती शाहू नगर प्रभागात एकही ट्रीगार्ड उपलब्ध झाले नाही.- सतीश विधाते, नगरसेवक, न.प. गडचिरोलीनगर परिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महसुली उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. शहरातील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन त्यानुसार खर्च दाखविण्यात आला आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात आला आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प मांडला आहे.- योगीता पिपरे, नगराध्यक्ष, न.प. गडचिरोली