शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पेरणीची कामे पडली आहेत ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 22:26 IST

रोहिणीनंतर आता मृग नक्षत्र सुध्दा कोरडा जात आहे. त्यामुळे पेरणीची कामे थांबली आहेत. पेरणी लांबल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच प्रचंड उकाड्यामुळे सामान्य नागरिकही मेटाकुटीस आला असून कधी पाऊस येतो व वातावरणात थंडावा निर्माण होतो, याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : सामान्य नागरिकांचेही उकाड्याने हाल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोहिणीनंतर आता मृग नक्षत्र सुध्दा कोरडा जात आहे. त्यामुळे पेरणीची कामे थांबली आहेत. पेरणी लांबल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच प्रचंड उकाड्यामुळे सामान्य नागरिकही मेटाकुटीस आला असून कधी पाऊस येतो व वातावरणात थंडावा निर्माण होतो, याकडे लक्ष लागले आहे.सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या सुरूवातीलाच पाऊस हजेरी लावत असल्याने पेरणीच्या कामांना सुरूवात होते. हाच अंदाज बांधून शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून खरीपपूर्व मशागतीच्या कामांना सुरूवात केली. मशागतीची कामे पूर्ण झाली तरी पावसाचा थेंबही अजूनपर्यंत पडला नाही. उलट कडक ऊन पडत आहे. दिवसा व रात्री सुध्दा उकाडा जाणवत आहे. पावसाळ्याचे दिवस नसून कडक उन्हाळा असावा, असे वातावरण निर्माण झाले आहे.पाऊस पडत नसल्याने पेरणीची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत. जेवढी पेरणीची कामे लांबतील. तेवढे उत्पादनात घट होते. तसेच नंतरही पावसाने दगा दिल्यास पीक करपण्याची शक्यता राहते. त्यामुळे शेतकरी सुध्दा चिंताग्रस्त झाला आहे. मागील वर्षी १४ जूनपर्यंत अर्ध्याहून अधिक पेरणीची कामे आटोपली होती. यावर्षी मात्र पाऊस झाला नाही. पाऊस पडल्यानंतर जवळपास आठ दिवसानंतर पेरणीला सुरूवात होते. त्यामुळे पेरणीची कामे आणखी आठ ते दहा दिवसांनी सुरूवात होण्याची शक्यता आहे.पाऊस पडला नसल्याने अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी पाहिजे त्या प्रमाणात बियाणे व रासायनिक खते सुध्दा खरेदी केली नाहीत. त्यामुळे कृषी केंद्र चालक सुध्दा अडचणीत आले आहेत.मागील वर्षी पडला होता १३१ मिमी पाऊसमागील वर्षी १४ जूनपर्यंत जिल्ह्यात १३०.९ मिमी पाऊस पडला होता. यावर्षी मात्र केवळ ४.९ मिमी पाऊस पडला आहे. पाऊस पडला आहे. त्यातीलही काही तालुक्यांमध्ये तर पावसाचे दर्शनच झाले नाही. त्यामुळे पेरणीची कामे पूर्णपणे ठप्प पडले आहेत. पाऊस पडल्यानंतर गवत उगवते. गवत उगवल्यानंतरच शेतकरी पेरणीच्या कामांना सुरूवात करतो. पावसाचे आगमन होण्यास पुन्हा चार ते पाच दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पेरण्या पुन्हा लांबण्याची शक्यता आहे.दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्यदर दिवशी तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वरच आहे. सकाळपासून वाढलेले तापमान सायंकाळपर्यंत कायम राहते. रात्रीसुध्दा प्रचंड गर्मी होत असल्याने कुल्लर सुध्दा काम करीत नाही. उकाड्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. मृग नक्षत्राला सुरूवात होऊन सुध्दा कडक ऊन पडत असल्याने दुपारच्या सुमारास रस्ते अजुनही निर्मनुष्य होत आहेत. उष्णतेमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस