शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:34 IST

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढावा, यासाठी आत्मा विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देआत्माचा पुढाकार : नैनपूर येथील शेतकऱ्यांचा धान पिकाच्या शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग

विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढावा, यासाठी आत्मा विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून देसाईगंज तालुक्याच्या नैनपूर येथील भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरत एकात्मिक तण व कीड नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्या शेतीत केला आहे. या गटातील शेतकरी तण व कीड नियंत्रणासाठी बदकाचा वापर करीत आहेत.आत्मा अंतर्गत नैनपूर येथे भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गट स्थापन करण्यात आला. या गटात एकूण २० शेतकरी सहभागी आहेत. या शेतकऱ्यांनी ४० एकर शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात तालुका तंत्र व्यवस्थापक महेश दोनाडकर कृषी सहायक कल्पना ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे. बदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. कोणत्याही तापमानात बदक सहज टिकतो. कीड व कीटक हे बदकांचे प्रमुख खाद्य आहे. कोरीया, जपान, थायलंड या देशात राईस डग फार्मिंग करताना बदकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच धर्तीवर आत्माच्या मार्गदर्शनात सेंद्रीय शेती करीत असलेल्या नैनपूर येथील शेतकºयांकडून धान शेतीतील तण व कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर सुरू आहे. भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गटाने २० बदकाची शेती केली असून त्याचे व्यवस्थापन व पोषण करण्याची जबाबदारी गटाचे सचिव शंकर भाजीपाले यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत या बदका धान पिकाच्या शेतीत सोडल्या जातात. धानाच्या खोडामध्ये सिलिका असल्याने हे बदक धान पीक न खाता धान पिकातील तण, खोडकिडे, तुडतुडे खातात. पिकावरील व चिखलातील कीडे खातात. यामुळे जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.विसोरा गावाजवळ जिल्ह्यातील एकमेव बदक पैदास केंद्र आहे. जनावराला होणाऱ्या फिनस रोगाचे निर्मूलन करण्यासाठी व शेतकºयांना बदकांची पिले पुरविण्याकरिता विसोरा गावाजवळ बदक पैदास केंद्राची स्थापना करण्यात आली. येथून शेतकरी बदक नेत आहेत.सेंद्रिय धान शेतीत बदक वापरल्याने सेंद्रिय शेतीची चाचणी कीड व तण निर्मुलन होते. तसेच यामुळे बदकांपासून धानाच्या उत्पादनात वाढ होते. तसेच पर्यावरण संतुलन व रक्षणाच्या दृष्टीने धान शेतीत बदकांचा वापर करणे हितकारक आहे. नैनपूर येथील शेतकऱ्यांनी बदकांचा प्रयोग सुरू केला आहे.- डॉ. प्रकाश पवार,प्रकल्प संचालक,आत्मा गडचिरोलीबदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. बदकाचा वापर खाण्यासाठी व अंडीसाठी होतो. बदकांचा वापर तण व किड निर्मुलनासाठी केल्यास शेतकºयांना जास्त फायदेशीर ठरु शकते. बदक पैदास प्रक्षेत्रात हॅचरीची सुविधा असल्याने शेतकºयांनी बदकांची मागणी केल्यास स्वस्त दरात बदक पिल्ले उपलब्ध करुन देता येईल.- डॉ. पी.जी.सुकारे,पशुधन विकास अधिकारी,बदक पैदास प्रक्षेत्र वडसा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती