शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

ऐतिहासिक गोरजाई मंदिराची दुरवस्था

By admin | Updated: February 8, 2015 23:45 IST

येथील नागवंशीय माना जमातीच्या ऐतिहासिक गोरजाई मंदिराच्या देवालयापर्यंत जाण्यास रस्ता नाही. या मंदिराची दुरवस्था झाली आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

वैरागड : येथील नागवंशीय माना जमातीच्या ऐतिहासिक गोरजाई मंदिराच्या देवालयापर्यंत जाण्यास रस्ता नाही. या मंदिराची दुरवस्था झाली आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.वैरागड येथे पुरातन किल्ला, भंडारेश्वर मंदिर, गोरजाई, आदिशक्ती व मुस्लिम समाज बांधवांचा इदगाह तसेच हेमाडपंथी मंदिर व गावाच्या दक्षिणेला खोब्रागडी नदीच्या काठावरील टेकडीवर भंडारेश्वर मंदिर आहे. भंडारेश्वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी सीमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला असून पूरातत्व विभागाकडून या किल्ल्याच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. मात्र गोरजाई मंदिराच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. १५ फेब्रुवारीला गोरजाई मंदिरात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून दरवर्षी गोरजाई मंदिरात यात्रा भरत आहे. तेव्हापासून या मंदिराची किरकोळ डागडुजी करण्यात आली. मात्र गोरजाई मंदिराचे स्वरूप बदलविण्यासाठी स्थानिक प्रशासन व पुरातत्व विभागाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. गावाच्या एका बाजुला गोरजाई डोहाच्या काठावर सभोवताल शेताचा वेढा असलेल्या ठिकाणी गोरजाई मंदिर आहे. ज्या प्रमाणे येथील ऐतिहासिक किल्ल्याला १८ बुरूज आहेत. त्याप्रमाणे गोरजाई मंदिर १८ रेखीव खांबावर उभे आहे. मंदिराचा उंच कळस व आत मध्ये देवाचा गाभारा व मूर्त्या आहेत. या मंदिरातील मूर्त्या त्या काळातील उत्तम कारागिरीची प्रचिती देतात. (वार्ताहर)