शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

दोटकुलीत मृतकालाही मिळाले शौचालय

By admin | Updated: April 26, 2017 01:01 IST

चामोर्शी तालुक्याच्या दोटकुली ग्रामपंचायतमध्ये स्वच्छ भारत मिशनमधून वैयक्तिक शौचालयाचा लाभ दोन...

 लाभार्थी निवड यादीत प्रचंड घोळ : एकाच कुटुंबाला दोनदा लाभ चामोर्शी : चामोर्शी तालुक्याच्या दोटकुली ग्रामपंचायतमध्ये स्वच्छ भारत मिशनमधून वैयक्तिक शौचालयाचा लाभ दोन वर्षापूर्वी मयत झालेल्या कासूबाई केशव पाल यांच्या भाच्याला वारसदार दाखवून निधीचा धनादेश वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. निवड यादीमध्ये बदल करून मंजूर यादीत नाव नसलेल्या लाभार्थ्यांच्या नावे धनादेश वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर शौचालयाचे बांधकाम न केलेल्या लाभार्थ्यांनाही धनादेश देण्यात आला आहे. हा सर्व प्रकार माहिती अधिकारातून माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर चुधरी यांनी माहिती मागितल्यामुळे उजेडात आला आहे. दोटकुली येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बेस लाईन सर्वे करण्यात आला. यानुसार ३०९ कुटुंबांचा सर्वे झाला. त्यातील ७६ कुटुंबांकडे शौचालय असल्याने त्यांना वगळण्यात आले व उर्वरित २३३ लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली. परंतु या यादीत एकाच कुटुंबातील पती पत्नींची नावे आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय लाभार्थ्यांने बांधकाम केल्यानंतर ग्रामपंचायतीने शौचालय बांधकाम केल्याचा चौकशी अहवाल पंचायत समितीला पाठविला जाते. त्यानंतर पंचायत समिती शौचालयाची रक्कम ग्रामपंचायतकडे देते. त्यानंतर ग्रामपंचायत प्रोत्साहनपर रक्कम म्हणून संबंधित लाभार्थ्याला देते. परंतु दोटकुली ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी संगणमत करून शौचालय न बांधणाऱ्या लाभार्थ्यांनाही धनादेश दिला आहे. ज्यांचे मंजूर यादीत नाव नाही, अशाही लाभार्थ्यांना धनादेश दिले आहेत. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत पंचायत समितीने २१८ लाभार्थ्यांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र ग्रामपंचायतीने २४ एप्रिल २०१७ पर्यंत केवळ १६८ लाभार्थ्यांनाच धनादेश दिले आहेत. पं.स. आमसभेत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे ग्रामपंचायतीने दाखविले. मात्र उर्वरित लाभार्थ्यांना धनादेश का देण्यात आले नाही. याची चौकशी करणे आवश्यक आहे. सरपंच श्रीरंग बालाजी बोदलकर यांच्या पत्नी उर्मीला श्रीरंग बोदलकर यांचे नाव बेसलाईन सर्वेमध्ये आहे. त्यांच्याकडे शौचालय नसल्याचे दाखवून त्यांच्या नावाच्या ऐवजी त्यांची सासू लहानू बालाजी बोदलकर यांचे नाव टाकण्यात आले आहे. या कुटुंबाचा आयडी क्रमांक एकच दाखविण्यात आला आहे. म्हणजे ते कुटुंब संयुक्त आहे. श्रीरंग बालाजी बोदलकर हे सरपंच असल्यामुळे त्यांच्याकडे शौचालय असणे बंधनकारक आहे, असे असताना त्यांनी आपल्या आईच्या नावे शौचालयाचा लाभ उचलला आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच जानकीराम पत्रू ठोंबे यांनी त्यांनी पत्नी इंदिराबाई जानकीराम ठोंबे यांच्या नावाने शौचालयाचा निधी हडप केला आहे. जानकीराम कवडू पोरटे, निर्मलाबाई जानकीराम पोरटे हे पतीपत्नी आहेत. बेसलाईन सर्वेमध्ये त्यांच्याकडे शौचालय असल्याचे दाखविण्यात आले. तरीही जानकीराम पोरटे यांच्या नावाने शौचालय मंजूर करण्यात आले. त्यांनी शौचालय न बांधतातच धनादेशाची उचल केली आहे. लक्ष्मीबाई लटारू आभारे ही सात वर्षांपासून बेपत्ता आहे. परंतु ग्रामपंचायतीने तिला मयत दाखवून तिचे पती लटारू गोमा आभारे यांना वारसदार बनवून धनादेश दिला. ते सुध्दा मुलाकडे संयुक्त कुटुंबात राहतात. त्यांच्या सुनेने यापूर्वीच शौचालय योजनेचा लाभ घेतला आहे. किसन पत्रू ठोंबे, दिपीका किसन ठोंबे, संदीप नक्टू बोदलकर, वनमाला संदीप बोदलकर हे पतीपत्नी असलेले जोडपे आहेत. या दोघांनाही शौचालय मंजूर झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी) तक्रारीची चौकशी करण्याची मागणी ज्या लाभार्थ्यांना शौचालयाच्या बांधकामाचे धनादेश देण्यात आले. त्यांच्या नावे घर आहे किंवा नाही, त्यांची नमूना ८ मध्ये नोंद आहे की नाही याची चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी जबाबदार असलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर सचिवावर कारवाई करावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर चुधरी यांनी केली आहे. सदर निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, पं.स. सभापती, संवर्ग विकास अधिकारी यांनाही पाठविले आहे.